अबू आझमींची करण जोहरवर टीका

Mumbai  -  

मुंबई - चित्रपट निर्माता करण जोहरला सरोगसीच्या मदतीने दोन मुल झाली आहेत. रविवारी ट्विटरवरून याबाबत कारण जोहरने माहिती दिल्यानंतर त्याला शुभेच्छा देण्यात आल्या. मात्र काहींना करण जोहरचं सिंगल फादर असणे मंजूर नाही. फिल्म अभिनेता तुषार कपूर नंतर आता करण जोहर यालाही टीकेला सामोरे जावे लागत आहे.


करण जोहरला मुलं पाहिजे होती तर त्याने लग्न करायला पाहिजे होते. काही अडचण असेल तर गरीब मुलांना दत्तक घ्यायला पाहिजे होते. गरीब मुलांचे भले झाले असते. मात्र अशा प्रकारे मुलांना जन्म देणे चुकीचे आहे. - अबू आझमी, आमदार

करण जोहर याने कायद्यात राहून हा निर्णय घेतला असेल तर त्यात काही चुकीचे नाही. - पंकजा मुंडे, महिला व बालकल्याण मंत्री

Loading Comments