भाजप नेत्यांकडे असलेल्या पैशांची चौकशी करा - अबू आझमी

 Vidhan Bhavan
भाजप नेत्यांकडे असलेल्या पैशांची चौकशी करा - अबू आझमी

नरिमन पॉईंट - जेवढे पैसे भाजप नेते विविध कामाला लावत आहेत, ते पैसे कुठून येत आहेत त्याची चौकशी करावी अशी मागणी समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांनी केलीय. तसेच सुभाष देशमुख यांच्या गाडीत रोकड मिऴाली त्यामुळे नरेंद्र मोदींनी त्यांचा राजीनामा घ्यावा,अशी मागणीही अबू आझमींनी केलीय. सामान्य नागरिकांना बँकेतून 1,2 हजार रुपये न मिळता ती रक्कम वाढवून 25 हजार करावी अशी मागणी आझमींनी केलीय. तसेच सरकार लोकांना भिकारी बनवत आहे याचा आम्ही विरोध करतो असं सांगत अबू आझमींनी सरकारवर टीका केलीय. भाजप नेत्यांकडे आधीपासून पैसा होता. ते त्याच्या आधारावर वोट बॅंक बनवत असल्याचाही आरोप अबू आझमींनी केलाय. तसेच भाजप नेत्यांनी पाचशे हजारांच्या नोटा रद्द होण्याआधी पैसे बदलले या राहुल गांधीजींच्या वक्तव्याचंही आझमींनी समर्थन केलंय.

Loading Comments