'काँग्रेसमधील मुस्लिम नेते लालदिव्याच्या मागे'

  Mumbai
  'काँग्रेसमधील मुस्लिम नेते लालदिव्याच्या मागे'
  मुंबई  -  

  नागपाडा - गेली अनेक वर्षे काँग्रेसची सत्ता असूनही मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालं नाही. काँग्रेसमध्ये एकही नेता नाही जो मुस्लिम समाजाच्या हक्कासाठी लढेल. काँग्रेसमध्ये जे मुस्लिम नेते आहेत, ते फक्त लालदिव्याच्या पाठीमागे धावत असल्याची टीका समाजवादी पार्टीचे नेते अबु आझमी यांनी केली. नागपाडा येथे गुरुवारी रात्री आयोजित सभेत ते बोलत होते.

  एकट्या नारायण राणेंनी काँग्रेसला दिल्लीपर्यंत हलवून सोडलं. मुस्लिम समाजाला त्यांच्यासारख्या मुस्लिम नेता मिळायला हवा. काँग्रेसमधील सर्व मुस्लिम नेते महापालिका निवडणूक डोळयांसमोर ठेवून मुस्लिमांची मतं लाटण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे मतांचं विभाजन होऊ देऊ नका असं आवाहन आझमी यांनी उपस्थितांना केलं. देशात दहशतवाद्यांच्या भीतीनं मशिदीमधलं अझान बंद केलं जातं, मात्र सिद्धिविनायक मंदिरातली पूजा बंद केली जात नाही, अशी टीका आझमी यांनी केली.

  मुंबईतल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी पोलीस दाऊद इब्राहिमला शोधत आहेत. मात्र बाळासाहेब ठाकरेंनी खुलेआम बाबरी मशीद तोडल्याचं म्हटल्यावरी त्यांना कोणत्याही सरकारनं अटक करण्याची हिंमत दाखवली नाही, असं आझमी म्हणाले. पण मुंबईत अडीच हजार जण मृत्युमुखी पडल्याची प्रतिक्रिया म्हणून मुंबईत बॉम्बस्फोट झाले, असं मी म्हणत असेन तर मात्र गुन्हेगार ठरतो, असंही त्यांनी नमूद केलं. देशात मुस्लिम समाज सुरक्षित नाही. मुस्लिम समाजाला वाचवण्यासाठी सपाला मतदान करा, असं आवाहनही त्यांनी केलं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.