Advertisement

अन, अामिर खान मंत्रालयात येतो तेव्हा


अन, अामिर खान मंत्रालयात येतो तेव्हा
SHARES

जेव्हा अामीर, शाहरुख किंवा सलमान खान एखाद्या ठिकाणी जातात तेव्हा त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमते. यावेळी बॉलिवूड सुपरस्टार अामिर खान गुरुवारी चक्क मंत्रालयात अवतरला. मात्र याची चाहूल ना प्रसार माध्यमांना लागली ना मंत्रालयात येणाऱ्या-जाणाऱ्यांना...त्यामुळे तो आला आणि थेट मुख्यमंत्र्यांकडे गेला.


का आला होता अामिर मंत्रालयात -

आमिर मंत्रायलात येण्याचे निमित्त होते वॉटर कप स्पर्धा. ही स्पर्धा पाणी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात येते. विशेष म्हणजे ही स्पर्धा राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेसाठी पूरक आहे. राज्य शासनाच्या सहकार्यामुळे वॉटर कप स्पर्धा यशस्वी झाली असून, यंदा 75 तालुक्यात ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावतीने मंत्रायलात आयोजित करण्यात येणाऱ्या या बैठकीला अामिरने हजेरी लावली होती.


त्यामुळेच ही स्पर्धा यशस्वी

'या स्पर्धेसाठी पाणी फाऊंडेशनला सहकार्य करावे', असे निर्देश यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 'गेल्या दोन वर्षात वॉटर कप स्पर्धेसाठी राज्य शासनाने आणि प्रशासनाने खूप मोठे सहकार्य केले आहे. त्यामुळेच ही स्पर्धा यशस्वी झाली असून, गावे पाणीदार होण्यास मदत झाली आहे. पहिल्या वर्षी तीन तालुके तर दुसऱ्या वर्षी 30 तालुक्याचा स्पर्धेत समावेश होता. यावेळी स्पर्धेत 75 तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यांमध्ये स्पर्धेपूर्वीची आणि स्पर्धेनंतरची गावे, यासंदर्भात प्रदर्शन भरवण्यात येणार असून त्याद्वारे लोकसहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार' असल्याचे अामिर म्हणाला.


पाणी फाऊंडेशनच्यावतीने यंदाही वॉटर कप स्पर्धा घेण्यात येत आहे. यामध्ये राज्यातील 24 जिल्ह्यातील 75 तालुक्यांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी सरपंच आणि उपसरपंच यांना तसेच ग्रामस्थांना तयार करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. या स्पर्धेमध्ये सीसीटी, शोष खड्डे आदी नरेगातील कामांचाही समावेश करण्यात यावा. या स्पर्धेच्या निमित्ताने गावातील पाणी टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री


वॉटर कप स्पर्धेबरोबरच पाणीदार झालेल्या गावांमधील झुडपे वाढवणे, जंगलांचे संवर्धन, मृदा आरोग्य आणि जल व्यवस्थापन आदी चार महत्त्वाच्या विषयांमध्ये काम करण्यास उत्सुक आहे.
- अामिर खान, अभिनेता

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा