Advertisement

‘मुलगी झाली हो’ मालिकेतून किरण मानेंना बाहेरचा रस्ता

किरण माने यांनी केलेल्या राजकीय वक्तव्यामुळे त्यांना मालिकेतून काढल्याची चर्चा सर्वत्र आहे.

‘मुलगी झाली हो’ मालिकेतून किरण मानेंना बाहेरचा रस्ता
SHARES

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील अभिनेते किरण माने (Actor Kiran Mane) यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. किरण माने हे आपल्या सोलश मीडियावरील परखड मतप्रदर्शनामुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र, यावेळी केलेल्या राजकीय भाष्यामुळे ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

किरण माने यांनी काही वेळापूर्वी एक फेसबुक पोस्ट टाकली. त्यात काल टो जुबान, आंसुओं से गाऊंगा… गाड दो, बीज हूँ मैं. पेड बन ही जाऊंगा! असी माने यांची पोस्ट आहे. या पोस्टनंतर आता सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहे. माने यांच्या भूमिकेचं त्यांच्या चाहत्यांकडून जोरदार समर्थन केलं जात आहे.

‘देशातील नागरिकांच्या दुर्दैवानं बातमी खरी आहे. तुम्ही सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवायचा नाही किंवा तुम्ही कुठल्या विचारधारेविरोधात आवाज उठवायचा नाही. नाहीतर आम्ही तुमच्या पोटावर पाय आणू, तुमचं जगणं मुश्किल करू असा एक संदेश देण्याचा प्रयत्न यातून झाला आहे. याचं कारण आहे की मी राजकीय पोस्ट म्हणता येणार नाही. पण मी एक विचारधारा मानणारा माणूस आहे आणि तशा पोस्ट मी करत असतो, असं माने म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, बऱ्याच पोस्ट माझ्या या तुकाराम महाराजांचे विद्रोही जे अभंग आहेत, त्याचं आताच्या परिस्थितीला जोडून निरुपण मी करत असतो. तुम्ही फेसबुकवर शोधलं, #तुकाआशेचाकिरण तर त्यावर तुम्हाला माझ्या अनेक पोस्ट सापडतील. ज्या तुकाराम महाराजांचे अभंग घेऊन त्यातील विद्रोही विचारांची उकल मी आज्या परिस्थितीशी जोडून केलेली आहे. त्याच्या विरुद्ध विचारधारा जी आहे, ज्या विचारधारेनं तुकाराम महाराजांना त्रास दिला, ज्या विचारधारेनं ज्ञानोबांना त्रास दिला, ज्या विचारधारेनं शिवरायांच्या राज्याभिषेकाला नकार दिला. त्या विचारधारेचे लोक पेटून उठतात. मला खूप त्रास झाला या ट्रोलर्सचा, असं माने म्हणाले.
हेही वाचा

मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यांना गडकिल्ल्यांची नावे

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा