Advertisement

मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यांना गडकिल्ल्यांची नावे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून सार्वजनिक बांधकाम खात्याने ही नव्या नामकरणाची कार्यवाही केली आहे.

मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यांना गडकिल्ल्यांची नावे
SHARES

राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे मंत्रालयासमोरील शासकीय बंगले आतापर्यंत क्रमांकांवरून ओळखले जात होते. यापुढे ते गडकिल्ल्यांच्या नावाने ओळखले जाणार आहेत. प्रत्येक बंगल्याला एका किल्ल्याचे नाव देण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून सार्वजनिक बांधकाम खात्याने ही नव्या नामकरणाची कार्यवाही केली आहे.

मंत्रालयासमोरील मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या शासकीय निवासस्थानांना गडकोट, किल्ले यांची नावे देण्यात यावीत अशा मागण्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आल्या होत्या.

उद्धव ठाकरे यांनी त्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. पुढीलप्रमाणे हे बंगले यापुढे ओळखले जाणार आहेत.

मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्याची बदलेली नावं

  • अ 3 – शिवगड, जितेंद्र आव्हाड
  • अ 4 – राजगड, दादा भुसे
  • अ 5 – प्रतापगड, केसी पाडवी
  • अ 6 – रायगड – आदित्य ठाकरे
  • बी 1 – सिंहगड – विजय वड्डेटीवार
  • बी 2 – रत्नसिंधू, –  उदय सामंत
  • बी 3 – जंजिरा, अमित देशमुख
  • बी 4 – पावनगड – वर्ष गायकवाड
  • बी 5 – विजयदुर्ग – हसन मुश्रीफ
  • बी 6 – सिद्धगड – यशोमती ठाकूर
  • बी 7 – पन्हाळगड – सुनील केदार
  • क 1 – सुवर्णगड, गुलाबराव पाटील
  • क 2 – ब्रह्मगिरी, संदीपान भुमरे
  • क 3 – पुरंदर
  • क 4 – शिवालय
  • क 5 – अजिंक्यतारा – अनिल परब
  • क 6 – प्रचितगड, बाळासाहेब पाटील
  • क 7 – जयगड
  • क 8 – विशाळगड
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा