'आदित्य संवाद' कार्यक्रमात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

'आदित्य संवाद' या कार्यक्रमातून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला. त्यावेळी या कार्यक्रमा दरम्यान एका तरुणीनं आदित्या ठाकरेंना आज भाजपसोबत युती केली, ‬भविष्यात मनसेसोबत युती करणार का? ‬असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर 'सतत भूमिका बदलणाऱ्यांसोबत आपण जात नाही' अशा शब्दात उत्तर देत आदित्या यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष आणि काका राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.

SHARE

तरुणाईच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी आणि त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी सोमवारी वरळीतील एनएससीआय डोममध्ये 'आदित्य संवाद' या कार्यक्रमातून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला. या कार्यक्रमादरम्यान एका तरुणीनं आदित्या ठाकरेंना आज भाजपसोबत युती केली, ‬भविष्यात मनसेसोबत युती करणार का? ‬असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर 'सतत भूमिका बदलणाऱ्यांसोबत आपण जात नाही' अशा शब्दात उत्तर देत आदित्य यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष आणि काका राज ठाकरे यांना टोला लगावला.  


देशहितासाठी युती 

'आपली आणि भाजपची भूमिका वर्षानुवर्ष कायम आहे. जे विरोधात आहेत, त्यांच्यासोबत आपण गेलेलो नाही' अशा शब्दांत आदित्य संवाद या कार्यक्रमात तरूणीनं विचारलेल्या प्रश्नावर आदित्य यांनी उत्तर दिलं. तसंच, 'शिवसेनेनं आणि भाजपनं आपले विचार, भूमिका कधीच बदललेली नाही. ही युती देशहितासाठी झाली आहे’, असं देखील आदित्य यांनी म्हटलं आहे.


तरुणांचा चांगला प्रतिसाद

आदित्य संवाद' हा कार्यक्र महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात शिक्षण, रस्ते, नाईट लाईफ यासारख्या प्रश्नांवर तरुण-तरुणी आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करत आहेत. हेही वाचा -

लोअर परळ स्थानकाबाहेर चेंगराचेंगरी, एक महिला जखमी

मध्य रेल्वेच्या परळ टर्मिनसहून सुटणार लांब पल्ल्याच्या गाड्यासंबंधित विषय
ताज्या बातम्या