पालिका निवडणुकीत चुरस

    मुंबई  -  

    मुंबई - महापालिकेच्या २२७ प्रभागांची सोडत सोमवारी जाहीर झाली. २०११ मध्ये करण्यात आलेल्या जनगणनेच्या आधारावर आगामी निवडणुकीसाठी प्रभागांची ही फेररचना करण्यात आली. पश्चिम उपनगरांमधील वाढलेल्या लोकसंख्येमुळे तिथे पाच प्रभाग वाढले आहेत. विलेपार्ले, वांद्रे, खार याविभागतही भाजपने अलीकडे वर्चस्व निर्माण केले आहे. मराठी मतदारांचे वर्चस्व असलेल्या विभागात भाजप आणि शिवसेनेत अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेना आणि भाजपच्या या राजकारणात मूळ मराठीचा मुद्दा मागे पडणार का? मात्र त्याचवेळी मनसेमुळे सेनेची मते फुटून भाजपला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जातेय. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष निरुपम यांच्यावर नाराज असलेले दिग्गज आणि त्यांचे कार्यकर्ते भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे मालवणी विभाग सोडता काँग्रेसचे नगरसेवक इतर ठिकाणी निवडून येण्याची शक्यता ही धूसर आहे.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.