Advertisement

परमेश्वर कदम यांच्यापाठोपाठ अाता दिलीप लांडे रडारवर?


परमेश्वर कदम यांच्यापाठोपाठ अाता दिलीप लांडे रडारवर?
SHARES

मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेले नगरसेवक परमेश्वर कदम यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून चौकशी सुरू असून त्यांनी बेकायदेशीर मालमत्ता जमा केल्याची बाब समोर आली आहे. कदम यांच्याविरोधात सुरू असलेल्या चौकशीनंतर अाता शिवसेनेत गेलेले अाणखी एक नगरसेवक दिलीप लांडे हे भाजपच्या रडारवर असल्याचं बोललं जात आहे.


उत्पन्नापेक्षा ६४ टक्के अधिक मालमत्ता

मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या शिवसेना पक्षातील विलीनीकरणाची अधिकृत घोषणा काही दिवसांपूर्वी महापालिका सभागृहात करण्यात आली. परंतु या सहापैकी एक असलेल्या घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक १२८चे नगरसेवक परमेश्वर कदम यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आलेल्या तक्रारीनंतर त्यांची चौकशी करण्यात आली. यामध्ये सन २००७ ते २०१२ या कालावधीत नगरसेवक कालावधीत त्यांनी स्वत:च्या नावावर बेनामी संपत्ती गोळा केल्याची तक्रार होती. त्यानुसार केलेल्या चौकशीत कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेत ६४.१७ टक्के अधिक मालमत्ता आढळून आली. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


किरीट सोमय्यांनी केले टार्गेट

मनसेच्या या सहाही नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यामुळे परमेश्वर कदम यांच्यानंतर आता दिलीप लांडे हे पुढील टार्गेट असण्याची शक्यता आहे. यासर्व नगरेसवकांनी शिवसेनेकडून पैसे घेऊन प्रवेश केल्याचा आरोप होता. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्वच नगरसेवक हे चौकशीच्या रडारवर असण्याची शक्यता बोलली जात आहे.


हेही वाचा -

मनसेचे 'ते' सहाही नगरसेवक शिवसेनेत, महापौरांची सभागृहात घोषणा


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा