Advertisement

दिल्ली, पंजाबनंतर 'आप'चं मुंबईवर लक्ष

आम आदमी पार्टीचं मुंबई निवडणुकीवर अधिक लक्ष असणार आहे.

दिल्ली, पंजाबनंतर 'आप'चं मुंबईवर लक्ष
SHARES

आम आदमी पार्टीन दिल्लीनंतर पंजाबमध्ये सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. दिल्ली, पंजाबनंतर आता आम आदमी पार्टीचं मुंबई निवडणुकीवर लक्ष असणार आहे.

अशियातील सर्वात मोठा अर्थसंकल्प असलेल्या महानगरपालिका निवडणुकाचाही विचार सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे येत्या निवडणुकित मुंबईकरांना एक नवा पर्याय मिळू शकतो. पण हा नवीन पर्याय शिवसेना आणि इतर पक्षासाठी दोकेदुखी ठरू शकतो.

मुंबई महानगरपालिकेबाबतही आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. आम आदमी पार्टी मुंबई या अधिकृत ट्विटर अकाउंटवर मुंबईत आपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या जल्लोषाचे व्हिडिओ शेअर केले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांकडून झलकवण्यात आलेल्या पोस्टरवर दिल्ली बदली, अब मुंबई की बारी! असं लिहण्यात आलं आहे.

यासोबतच काही ठिकाणी आपचे पोस्टर लावण्यात आले आहेत. इच्छुक असणाऱ्यांनी पक्ष नोंदणीसाठी पुढाकार घ्या अशा प्रकारचं आवाहन पोस्टरद्वारे करण्यात आलं आहे. त्यासोबतच पक्ष नोंदणीसाठी नंबरही देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईच्या राजकारणात लवकरच आपची एन्ट्री होऊ शकते.  

मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात आम आदमी पार्टी कशी रणनिती आखते, याकडे कार्यकर्त्यांचा लक्ष लागून आहे.  



हेही वाचा

"आमचं राजकारण नकलांवर नाही कामावर, संघर्षांवर उभं"

पर्याय उपलब्ध, फक्त डोळे उघडे ठेवावे लागतात - अमेय खोपकर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा