Advertisement

"आमचं राजकारण नकलांवर नाही कामावर, संघर्षांवर उभं"

राज ठाकरे यांच्या टीकेला आता संजय राऊत यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

"आमचं राजकारण नकलांवर नाही कामावर, संघर्षांवर उभं"
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) १६ व्या वर्धापन दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संजय राऊत यांची नक्कल केली होती. राज यांच्या या टीकेला आता संजय राऊत यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आमचं राजकारण हे नकलांवर नाही तर कामावर, संघर्षावर उभं असल्याचा पलटवार संजय राऊत यांनी केलाय.

संजय राऊत म्हणाले की, ‘नक्कल केली चांगील गोष्ट आहे. नक्कल मोठ्या माणसांची करतात. तुम्ही बोला, तुम्ही बोललं पाहिजे, सगळ्यांनी बोललं पाहिजे अशी स्थिती आहे. ईडीनं आम्हाला बोलावलं म्हणून गप्प बसलेलो नाही. ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. जे सत्य आहे त्यावर शिवसेना बोलणार डुप्लिकेट काही नाही. आमचं राजकारण नकलांवर उभं नाही. आमचं राजकारण स्वाभिमान, कामावर आणि संघर्षावर उभं आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालांबद्दल उद्या पाहावं लागेल. काही लोक आजारी नसताना ही सक्रीय नसतात. मुख्यमंत्र्या इतकं कुणीच सक्रिय नाही, म्हणून तर राज्य पुढं चाललंय.’

बुधवारी राज ठाकरे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यावेळी राज यांनी संजय राऊत यांची नक्कलही केली.

‘ते संजय राऊत… किती बोलतात. सगळ्यांची एक अॅक्शन असते. चॅनल लागलं की हे सुरु, कॅमेरा हटला की सगळं नॉर्मल, असं राज ठाकरे म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, एकदा असाच एका सभेला गेलो होतो. सगळं साधं व्यवस्थित बोलत होते. तेवढ्यात त्यांच्या नावाची घोषणा नाही. मी आलो.. भाषण करतो.. म्हटलं ये. आज.. इखे जमलेले सर्व…. अरे आता नीट बोलत होता. काय प्रॉब्लेम झाला. डोळे मोठे करणार, भुवया उडवणार.. किती बोलतो. प्रश्न बोलायचा नाही. आपण काय बोलतो आहोत, कसं बोलतो आहोत. भविष्यातल्या महाराष्ट्रातल्या पिढ्या पाहत आहेत हे. ते उद्या काय शिकतील? असा सवाल करत राज यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली.



हेही वाचा

पर्याय उपलब्ध, फक्त डोळे उघडे ठेवावे लागतात - अमेय खोपकर

पालिका निवडणुका पुढे का ढकलल्या? राज ठाकरेंनी सांगितलं कारण

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा