Advertisement

पर्याय उपलब्ध, फक्त डोळे उघडे ठेवावे लागतात - अमेय खोपकर

पंजाबमधील हे महापरिवर्तन लक्षात घेत मनसे नेते अमेय खोपकर यांनी ‘प्रस्थापितांना नाकरुन पंजाबने देशासमोर आदर्श ठेवला आहे’, असं म्हटलं आहे.

पर्याय उपलब्ध, फक्त डोळे उघडे ठेवावे लागतात - अमेय खोपकर
SHARES

उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरु आहे. सध्याची आकडेवारी पाहता पंजाब वगळता इतर ४ राज्यात भाजपाचा विजय होणार असल्याचं समजतं. परंतू, पंजाबमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये आम आदमी पार्टीने (AAP) मुसंडी मारली असून ६४ हून अधिकजागांवर आघाडी घेतली. पंजाबमधील हे महापरिवर्तन लक्षात घेत मनसे नेते अमेय खोपकर यांनी ‘प्रस्थापितांना नाकरुन पंजाबने देशासमोर आदर्श ठेवला आहे’, असं म्हटलं आहे.

‘प्रस्थापितांना नाकरुन पंजाबने देशासमोर आदर्श ठेवला आहे. तसेच पर्याय उपलब्ध असतात, फक्त डोळे उघडे ठेवावे लागतात’, असं अमेय खोपकर यांनी ट्विटद्वारे म्हटलं. मनसे नेते अमेय खोपकरांच्या या विधानानंतर राज्यातील जनता महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

पंजाब विधानसभा निवडणूक निकालात आम आदमी पार्टीने प्रस्थापितांना धक्का देत मोठे यश प्राप्त केले आहे. पंजाबमधील स्थानिक पक्षांना नाकारत, तसेच प्रस्थापितांविरोधात मतदान झाल्याचा कौल सुरुवातीच्या कलांमध्ये दिसून आला आहे.

पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँगेसचे अनेक दिग्गज नेते पिछाडीवर आहेत. तसेच शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल देखील पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.

अंतिम निकालानंतर पंजाबमधील राजकीय स्थिती स्पष्ट होईल. मात्र सध्याच्या निकालांनी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, आज जे निकाल हाती आले आहेत, त्या निवडणुका आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी भगवंत मान यांच्या नेतृत्त्वाखाली पंजाबमध्ये लढवल्या होत्या. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा