Advertisement

मुंबई काँग्रेसमध्ये गटबाजीला पुन्हा उधाण, ‘हे’ काँग्रेसचे नेतेच करताहेत एकमेकांवर चिखलफेक

मिलिंद देवरा यांनी अध्यक्षपद सोडल्याबरोबर मुंबई काँग्रेसमधील गटबाजीने पुन्हा डोकं वर काढलं आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांनी देवरा यांच्यावर ट्विटरवरून निशाणा साधला.

मुंबई काँग्रेसमध्ये गटबाजीला पुन्हा उधाण, ‘हे’ काँग्रेसचे नेतेच करताहेत एकमेकांवर चिखलफेक
SHARES

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर त्यांच्यापाठोपाठ प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची काँग्रेस नेत्यांमध्ये ओढ लागली आहे. त्यानुसार रविवारी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी अध्यक्षपद सोडल्याबरोबर मुंबई काँग्रेसमधील गटबाजीने पुन्हा डोकं वर काढलं आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांनी देवरा यांच्यावर ट्विटरवरून निशाणा साधल्यावर देवरा यांचे पाठिराखे काँग्रेस नेते भाई जगताप यांनीही त्यांच्यावर पटलवार केला आहे.

जबाबदारी स्वीकारत राजीनामा

देवरा यांनी राजीनामा देतानाच येणारी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन काँग्रेसची धुरा काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांच्या ३ सदस्यीय समितीकडे सोपवण्याची सूचना पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून केली आहे. मुंबईतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून देवरा यांनी राजीनामा दिला असला, तरी त्यांनी राष्ट्रीय राजकारणात काम करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.

काय म्हणाले निरूपम?

त्यावर भाष्य करताना संजय निरूपम यांनी देवरांवर ट्वंटद्वारे निशाणा साधला. यांत ते म्हणाले की, राजीनाम्यातून त्यागाची भावना अंतःप्रेरणेतून येते. इथे दुसऱ्या क्षणी राष्ट्रीय पदाची मागणी केली जाते. हा राजीनामा आहे की वरच्या पदावर जाण्याची शिडी? अशा 'कर्मठ' लोकांपासून पक्षानं सावध राहायला हवं.  

जगताप यांचा पलटवार

या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देताना भाई जगताप म्हणाले, काही नेते काँग्रेसी असल्याचा दावा करतात. पण तेच जातीयवाद आणि भाषावादाचं राजकारण करतात. ते अन्य नेत्यांचा अपमान करतात आणि त्यांच्याच मतदारसंघातून निवडणूक लढवतात. इतकं सगळं करूनही तब्बल अडीच लाखांहून अधिक मतांनी पराभूत होतात. अशा 'कर्मठ' नेत्यांपासून सावध राहायला हवं.

पक्षांतर्गत वादामुळे काँग्रेसपुढील आव्हान वाढल्याचं दिसून येत आहे. 



हेही वाचा-

मिलिंद देवरा यांनी दिला मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

वंचित पुढे काँग्रेसच वंचित? ४० जागांचा प्रस्ताव देऊन केली थट्टा



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा