Advertisement

मिलिंद देवरा यांनी दिला मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अशोक चव्हाण यांसह इतर नेत्यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी रविवारी पदाचा राजीनामा दिला आहे.

मिलिंद देवरा यांनी दिला मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
SHARES

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अशोक चव्हाण यांसह इतर नेत्यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी रविवारी पदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत मिलिंद देवरांनी राजीनामा दिल्याच समजतं आहे. मिलिंद देवरा यांची लोकसभा निवडणुकीपूर्वी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, एका मागोमाग एक नेते राजीनामा देत असल्यानं राजीनामा काँग्रेसला मोठा धक्का बसण्यची शक्यता आहे.

तीन सदस्यीय पॅनेल

मिलिंद देवरा यांनी पदाचा राजीनामा देताना, आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मुंबई कॉंग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी तीन सदस्यीय पॅनेलचा प्रस्ताव मांडला आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना आणि वंचित आघाडीचा सामना करणं हे काँग्रेससाठी मोठं आव्हान असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

'हे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खरगे आणि के.सी. वेणुगोपाल यांना सांगण्यात आले आहे, 'हे पाऊल एआयसीसीचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजीनामा देण्याबरोबरच एकनिष्ठा आणि सामूहिक जबाबदारीची अभिव्यक्ती म्हणून उचलण्यात आलं', असं मिलिंद देवरा यांच्या कार्यालयातून आलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

निरुपम यांची टीका

मिलिंद देवरा यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतप काँग्रेस नेते आणि माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी अप्रत्यक्ष टीका केली आहे. 'राजीनाम्यात त्यागाची भावना अंतर्भूत असते. येथे तर दुसऱ्या क्षणाला राष्ट्रीय पातळीवरचं पद मागितलं जात आहे. हा राजीनामा आहे की वर जाण्याची शिडी? पक्षाने अशा कर्मठ लोकांपासून सावध राहावे’, अशा शब्दांत निरुपम यांनी ट्विटरवरून देवरा यांच्यावर टीका केली आहे. त्याशिवाय त्यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाऐवजी ३ सदस्यीय समिती स्थापन करण्याच्या निर्णयाबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे पक्षाचे नुकसान होईल अशी भिती त्यांनी व्यक्त केली आहे.हेही वाचा -

राज ठाकरे दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेणार

मुंबईतील काही भागांमध्ये ९ आणि १० जुलैला पाणीपुरवठा बंदRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा