राज ठाकरे दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान राज ठाकरे निवडणूक आयुक्तांसमोर आपली ईव्हीएमबाबतची भूमिका मांडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

SHARE

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान राज ठाकरे निवडणूक आयुक्तांसमोर आपली ईव्हीएमबाबतची भूमिका मांडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भेटीसाठी राज ठाकरे रविवारी दुपारी आपल्या नेत्यांसह दिल्लीला रवाना झाले आहेत. 

ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह

राज ठाकरे आणि त्यांच्यासोबतचे नेते सोमवारी दुपारी १२ वाजता केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेतलोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसंच, निवडणूक आयोगाच्या भूमिकांवर देखील नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळं आता राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आपली भूमिका थेट मुख्य निवडणूक आयुक्तांकडं मांडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

१४ वर्षांनंतर दिल्लीत

राज ठाकरे तब्बल १४ वर्षांनंतर दिल्लीला गेले आहेत. याआधी २००५ मध्ये दिल्लीला गेले होते. लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी भाजप-शिवसेना विरोधात १० सभा घेतल्या होत्या. त्यांच्या या सभांना मतदारांचा चांगला सहभागही मिळाला होता. मात्र निकालावेळी भाजप-शिवसेना जिकल्याचं चित्र पाहायला मिळालं. हेही वाचा -

मुंबईतील काही भागांमध्ये ९ आणि १० जुलैला पाणीपुरवठा बंद

मुंबईसह राज्यातील रिक्षाचालक ९ जुलैला संपावरसंबंधित विषय
ताज्या बातम्या