Advertisement

सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी अजित पवारांचा मोठा दावा

सुप्रीम कोर्ट आज सकाळी 11 वाजता महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल देणार आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी अजित पवारांचा मोठा दावा
SHARES

आज संपूर्ण देशाचं लक्ष सुप्रीम कोर्ट (Supreme Court) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात काय निकाल देणार याकडे लागलं आहे. यादरम्यान विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठं विधान केलं आहे. 

"सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे. पण मला वाटतं ते विधानसभा अध्यक्षांकडे प्रकरण सोपवतील. ही शक्यता नाकारता येत नाही. विधीमंडळातील बाब असल्याने ते विधानसभा अध्यक्षांनाच याची माहिती घेत निर्णय घेण्यास सांगतील," अशी शक्यता अजित पवारांनी व्यक्त केली आहे.

तसंच 145 आमदारांचं पाठबळ जोपर्यंत आहे तोपर्यंत सरकारला धोका आहे असं म्हणण्यात अर्थ नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. 

सुप्रीम कोर्ट आज सकाळी 11 वाजता महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल देणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलेलं असताना तर्क वितर्क लावले जात आहेत.

एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार की राहणार? यासह बंड करणाऱ्या इतर आमदारांचं काय होणार? सर्वोच्च न्यायालय १६ आमदारांना निलंबित करणार की विधानसभा अध्यक्षांकडे निर्णय घेण्यास पाठवणार? राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार?  निर्णय एकनाथ शिंदे यांच्या विरोधात गेला तर निवडणूक आयोगाच्या निर्णयावर काय परिणाम होईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज ११ वाजता मिळणार आहेत.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा