Advertisement

कोरोनाचं संकट अद्याप संपलेलं नाही- अजित पवार

यंदाचा शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करत असतानाच कोरोना संदर्भातील सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेण्यात यावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.

कोरोनाचं संकट अद्याप संपलेलं नाही- अजित पवार
SHARES

राज्यावरील कोरोनाचं संकट अद्याप पूर्णपणे संपलेलं नाही. अशा परिस्थितीत सण-उत्सव सुरक्षित वातावरणात आणि साधेपणाने साजरे करावे लागतील. यंदाचा शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करत असतानाच कोरोना संदर्भातील सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेण्यात यावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी केलं.

व्हिव्हिआयपी सर्किट हाऊस इथं शिवजयंती उत्सव आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीत खा‌सदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतारे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण उपस्थित होते.

हेही वाचा- राज्यात शुक्रवारी २१,६१० कर्मचाऱ्यांचं कोरोना लसीकरण पूर्ण

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, गेल्यावर्षी मार्चपासून कोरोनाचं (coronavirus) संकट आलं. त्यामुळे या काळात आलेले सर्व धर्मांचे सण, उत्सव साधेपणाने साजरे करण्यात आले. यंदा १९ फेब्रुवारी रोजी असणारी शिवजयंती आपण उत्साहात, सुरक्षित वातावरणात आणि साधेपणाने साजरी करू. शासनाच्या आवाहनाला जनतेने नेहमीच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, याही वेळेस तसा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवजयंतीच्या निमित्ताने शिवनेरी गडावर राज्याचे प्रमुख अभिवादनासाठी येण्याची परंपरा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दिवशी अभिवादनासाठी येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

शिवनेरी गडावर करण्यात येणारी विकासकामे दर्जेदार होतील, अशी दक्षता घेण्याच्याही सूचना त्यांनी केल्या. जिथं पुरातत्व विभाग, वन विभागाच्या परवानग्या घेणं आवश्यक आहे तिथं परवानग्या घेण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी, असंही त्यांनी सांगितलं.

बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळे आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

(ajit pawar request to celebrate shiv jayanti simply in maharashtra)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा