Advertisement

या कारणांमुळे अजित पवारांनी भाजपला साथ दिली

काँग्रेस शिवसेनेसोबत जाऊन राज्याला स्थिर सरकार देता येणार नाही. पक्षवाढीसाठीही स्थिर सरकारमध्ये राहणं उत्तम, फाटाफुटीची भीती नाही. भाजपा मजबूत पक्ष, राज्याच्या प्रगतीसाठी भाजपसोबत जाणं शहाणपणाचं असल्याचे अजित पवारांना वाटले असावे.

या कारणांमुळे अजित पवारांनी भाजपला साथ दिली
SHARES

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्ष सर्वेसर्वा शरद पवार यांना विश्वासात न घेता का भाजपला साथ दिली. या घटनेनंतर राज्याच्या राजकारणत एकच भूकंप झाला.  अजित पवारांनी मात्र का भाजपला साथ दिली. याबाबतच्या चर्चांना उधाण आले अजित पवारांनी शरद पवारांशी केलेल्या बंडखोरीची चर्चा राजकिय वर्तुळात रंगू लागली. शिवसेना-काँग्रेस यांच्यातील मतभेद आणि खालील दहा कारणांमुळेच  दादांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.

मूळात सत्तासंघर्षाला सुरूवात झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस विरोधीबाकावर बसण्यास तयार होती. मात्र शिवसेनेने पुढे केलेल्या मैत्रीच्या हातामुळे शरद पवारांनी त्या गोष्टीला पुढाकार घेतला. मात्र शिवसेनेकडे ताकदीचं नेतृत्व नाही, मुख्यमंत्रिपदासाठी दमदार उमेदवार नव्हता. त्यातच काँग्रेसचा संपूर्ण कारभार दिल्लीतून चालतो, त्या पक्षात  राज्य नेतृत्वाला अधिकार नाहीत. राज्यात काँग्रेसची अवस्था बिकट, ग्रामपंचायतीतसुद्धा निवडूण येणं कठीण झालं आहे. शिवसेनेचा कारभार मातोश्रीवरुन, राज्य चालवण्याचा अनुभव कुणालाच नाहीकाँग्रेस शिवसेनेसोबत जाऊन राज्याला स्थिर सरकार देता येणार नाही. पक्षवाढीसाठीही स्थिर सरकारमध्ये राहणं उत्तम, फाटाफुटीची भीती नाहीभाजपा मजबूत पक्ष, राज्याच्या प्रगतीसाठी भाजपसोबत जाणं शहाणपणाचं असल्याचे अजित पवारांना वाटले असावे.

त्याच बरोबर केंद्रात भाजपची सत्ता आहे, राज्याच्या विकासासाठी कामी येईलशेतकरी, मजूर, कामगारांचे प्रश्न तडीला लावण्यासाठी मदत होऊ शकतेबदलत्या राजकीय स्थितीत काँग्रेस-सेनेसोबत जाणं आत्मघातकी ठरु शकतं. त्यातच अनेक निर्णयावर काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येणं अशक्य असल्यामुळे हे सरकार फारकाळ टिकणार नाही. या कारणांमुळे अजित पवारांनी महाविकास आघाडीसोबत न जाता भाजपला पाठिंबा दिला असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा