Advertisement

'मुंबई ठरतेय कॅशकाऊ'


SHARES

दादर - आंबेडकरी चळवळ आणि नंतर त्यात उभे राहिलेले अंतर्गत वाद...शिवस्मारकाची घोषणा आणि आंबेडकर स्मारकाची सद्यस्थिती...सिद्धार्थ कॉलेजमधला वाद आणि त्यात होणारा इतर राजकीय पक्षांचा हस्तक्षेप.. अशा अनेक विषयांवर रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी मुंबई लाईव्हच्या उंगली उठाव या कार्यक्रमात बोलताना सडेतोड उत्तरं दिली.

 

 

 

 

 

                                                      पूर्ण मुलाखत पहाण्यासाठी इथे क्लिक करा

मुंबईचा वापर सरकार फक्त कॅशकाऊसारखा करतंय असा थेट आरोपही त्यांनी यावेळी केला. भ्रष्टाचारी सरकारमुळे मुंबईचा विकास मागे पडल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचवेळी आंबेडकरी चळवळीमध्ये अंतर्गत वाद असल्याचं मान्य करतानाच ही चळवळ पुन्हा उभी राहील असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी यावेळी निशाणा साधला. मोदी हे हुकुमशाही पद्धतीने काम करत असल्याची टीका करत अनेक विषयांवर त्यांनी रोखठोक भूमिका यावेळी मांडली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा