मराठ्यांच्या मोर्चाला रिपाइंचा पाठिंबा

 BMC
मराठ्यांच्या मोर्चाला रिपाइंचा पाठिंबा

फोर्ट - मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी मराठा समाजाच्यावतीने ठिकठिकाणी जे मोर्चे काढले जातील, त्याला संपूर्णपणे पाठिंबा असेल अशी घोषणा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठा आघाडीचे अध्यक्ष महेंद्र शिर्के यांनी केली. शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

'दलित मराठा समाजात एकता असलीच पाहिजे', 'त्यासाठी लोकनेते रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्टोबर महिन्यात शिर्डी येथे दलित मराठा ऐक्य परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे' ' राज्यातील आजी माजी लोकप्रतिनिधी मराठा समाजाविरोधात आक्रोशाचे राजकारण करू पाहत आहे', यापुढे रिपाइं मराठा आघाडीचे कायकर्तेही मोर्चात सहभागी होतील', असेही शिर्के यांनी सांगितले.

Loading Comments