Advertisement

वाईट नेता मिळणे ही महाराष्ट्राची चूक नाही- अमृता फडणवीस

'वाईट नेता मिळणे ही महाराष्ट्राची चूक नाही, पण अशा नेत्यासोबत राहणं ही चूक आहे’, असे म्हणत 'जागो महाराष्ट्र' अशी टिप्पणी केली आहे.

वाईट नेता मिळणे ही महाराष्ट्राची चूक नाही- अमृता फडणवीस
SHARES

मागील काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री व भाजपचे विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ट्विटरवर प्रचंड सक्रिय झाल्या आहेत. ट्विटरच्या माध्यमातून त्या ठाकरे सरकारवर टीका करत आहेत. त्याच्या टीकांची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा असून, पुन्हा एकदा त्यांनी ट्विट करून उद्धव ठाकरेंवर निशाना साधला आहे. 'वाईट नेता मिळणे ही महाराष्ट्राची चूक नाही, पण अशा नेत्यासोबत राहणं ही चूक आहे’, असे म्हणत 'जागो महाराष्ट्र' अशी टिप्पणी केली आहे.

उद्धव ठाकरेंचा द्वेष

'वर्षा' या मुख्यमंत्री बंगल्यावरील एका बेडरूममध्ये उद्धव ठाकरेंचा द्वेष करणारा मजकूर लिहिलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये देवेंद्र फडणवीस रॉक्स असं लिहीण्यात आलं आहे. तसंच, हू इज यू टी म्हणजे यु टी कोण आहेत...? यू टी इज मीन म्हणजे यू टी वाईट आहेत. 'यूटी' म्हणजे नेमकं कोण?; यावरून आता तर्कवितर्क लावले जात असले तरी उद्धव ठाकरे यांच्या नावाचं इंग्रजीतील संक्षिप्त रूप 'यूटी' असं होतं. त्यामुळं हे त्यांनाच उद्देशून असल्याची चर्चा आहे. मात्र, ते नेमकं कोणी लिहिलं आहे, व्हिडिओ कोणी चित्रण केला आहे, याबाबत मात्र कोणतीही सध्या माहिती समोर आलेली नाही.


दिविजानं लिहिल्याची चर्चा

बंगल्यातल्या भिंतीवरील हा मजकूर फडणवीसांची मुलगी दिविजानं लिहिल्याची चर्चा होत होती. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना, मी बंगला सोडताना कोपरा कोपरा पाहिलेला आहे. यामुळे तिनं असं केलेलं नाही, असं म्हटलं आहे. तसंच हे आपल्याविरोधातील षड्यंत्र असल्याचा आरोप केला आहे. तिथे स्टाफही राहतो. त्यांच्या खेळणाऱ्या मुलांपैकी कोणीतरी केलं असेल. तर अमृता फडणवीस यांनी यावर खुलासा करताना आम्ही महिन्यापूर्वीच वर्षा बंगला सोडला आहे. बंगला सोडताना सगळं तपासलेलं होतं. त्यानंतर एकदाही तिथे गेलेलो नाही. हे लिखाण दिविजा किंवा अन्य कोणी केलेलं नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

या सर्व घटनेनंतर ट्विटरवर त्यांनी एका वृत्तसंस्थेच्या ट्विटला रिट्विट करत उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. 'वाईट नेता मिळणे ही महाराष्ट्राची चूक नाही, पण अशा नेत्यासोबत राहणं ही चूक आहे’, असे म्हणत 'जागो महाराष्ट्र' अशी टिप्पणी केली आहे.



हेही वाचा -

प्रवाशांची फसवणूक केली तर रोज रिक्षा फोडणार- नितीन नांदगावकर

मुंबईतील हवेची गुणवत्ता वाईट



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा