Coronavirus cases in Maharashtra: 441Mumbai: 235Pune: 48Islampur Sangli: 25Ahmednagar: 17Nagpur: 16Pimpri Chinchwad: 15Thane: 14Kalyan-Dombivali: 9Navi Mumbai: 8Vasai-Virar: 6Buldhana: 6Yavatmal: 4Satara: 3Aurangabad: 3Panvel: 2Kolhapur: 2Ulhasnagar: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Nashik: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 19Total Discharged: 42BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

या ‘सेलिब्रिटींना’ शपथविधीला निमंत्रण

उद्धव ठाकरेंच्या शपतविधीला कलावर्तुळातील काही प्रसिद्ध चेहरेसुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

या ‘सेलिब्रिटींना’ शपथविधीला निमंत्रण
SHARE

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव महाविकास आघाडीकडून एकमताने पुढे करण्यात आलं.  उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला अवघे काही तास उरले असताना देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक दिग्गज नेते या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. कार्यक्रम जरी राजकीय असला, तरी सेलिब्रिटीच्या उपस्थितीशिवाय तो पूर्ण होत नाही.

प्रदीर्घ काळाच्या प्रतिक्षेनंतर अखेर महाराष्ट्राला पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री मिळत आहे. त्यामुळे हा क्षण अनेकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे. या दिमाखदार सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. त्यासाठी शिवतीर्थावर जंगी तयारी करण्यात आली आहे. या शपथविधीला कलावर्तुळातील काही प्रसिद्ध चेहरेसुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या महानायक अमिताभ बच्चन, ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर, आशा भोसले, मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान, सलमान खान, धकधक गर्ल माधुरी दीक्षित, संजय दत्त, कपूर कुटुंबियांना निमंत्रण पाठवल्याचं कळत आहे.


हेही वाचाः- ‘हे’ 6 नेते घेणार उद्धव ठाकरेंसोबत शपथ

ठाकरे कुटुंबियांचे अनेक कलाकारांशी घरोब्याचे संबध आहेत. उद्योजकांशी असणारे त्यांचे घनिष्ट संबंध पाहता राजकीय नेतेमंडळींसोबतच बी- टाऊन सेलिब्रिटींपैकी कोण या सोहळ्याला हजर राहतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सुरक्षेपासून ते भव्य सेटपर्यंत सर्वच तयारीची लगबग सुरु आहे. महाविकास आघाडीचे सर्व नेते जातीने व्यवस्था पाहत आहेत. तर, या सोहळ्यासाठी शिवराज्याभिषेकाच्या प्रसंगाची आठवण करुन देणारा भव्य सेट साकारण्याची जबाबदारी लोकप्रिय कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी घेतली आहे. एकंदरच हा सोहळा अनेकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा असेल.

संबंधित विषय
ताज्या बातम्या