Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ताफ्यात अनोळखी कार घुसली आणि...

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच सुरक्षेत एक मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ताफ्यात अनोळखी कार घुसली आणि...
SHARES

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याच सुरक्षेत  एक मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राजभवनावर (Raj Bhawan) गेले होते. तिथून परतत असताना धक्कादायक प्रकार घडला. या प्रकारामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. पण मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामधील गाड्यांचा वेग कमी असल्याने मोठा अपघात टळला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारचा ताफा राजभवन येथून 'वर्षा' निवास्थानी जात असताना एका व्यक्तीने त्याची कार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रोटोकॉल तोडून आतमध्ये घुसवली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारचा ताफा अचनाक तात्काळ थांबवावा लागला. 

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुरक्षा कवच भेदून एका व्यक्तीने त्याची कार थेट मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसवली. या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांच्या कार समोरच त्याची कार घुसवल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा