Advertisement

Andheri Bypoll Election Result 2022: ऋतुजा लटके 46 हजार 296 मतांनी विजयी

नोटाला त्याखालोखाल दुस-या पसंतीची 12 हजार 776 मतं मिळालीयत.

Andheri Bypoll Election Result 2022: ऋतुजा लटके 46 हजार 296 मतांनी विजयी
SHARES

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी पार पडलेल्या निवडणुकीत ऋतुजा लटके विजयी झाल्या आहेत.

ठाकरे गटाच्या (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) ऋतुजा लटके (Rutuja Latke News) या 46 हजार 296 मतांनी विजयी झाल्यात. पण या मतमोजणीत खरा सामना रंगला तो ऋतुजा लटके आणि नोटाला मिळालेल्या मतांमध्ये. लटकेंना 19 व्या फेरीअखेर 66 हजार 247 मतं मिळाली.

तर नोटाला त्याखालोखाल दुस-या पसंतीची 12 हजार 776 मतं मिळालीयत. पण दुसरीकडे इतर सर्व अपक्ष उमेदवारांचं डिपॉझिट मात्र जप्त झालंय. अपक्ष उमेदवारांच्या बेरजेपेक्षाही जास्त मतं ही नोटाला मिळालीत. दरम्यान ऋतुजा लटके उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर दाखल झाल्यात.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी पार पडलेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये ऋतुजा लटके या मोठ्या मताधिक्याने आघाडीवर होत्या. पहिल्या फेरीत त्यांना ४२७७ मते तर दुसऱ्या फेरीत ७८१७ मते मिळाली आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गुंदवली मनपा शाळेमध्ये सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात झाली. या मतमोजणीसाठी २०० अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन, राज्य शासनाची विविध खाती, बृहन्मुंबई महानगरपालिका, म्हाडा, महावितरण, प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई मेट्रो, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यासारख्या विविध संस्थांच्या अखत्यारीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा