Advertisement

अंधेरी पोटनिवडणूक जाहीर, 3 नोव्हेंबरला मतदान, तर 6 नोव्हेंबरला मतमोजणी

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

अंधेरी पोटनिवडणूक जाहीर, 3 नोव्हेंबरला मतदान, तर 6 नोव्हेंबरला मतमोजणी
SHARES

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक (Andheri Bypoll Elections) जाहीर झाली आहे. 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 6 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचं 12 मे रोजी दुबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. आता या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. राज्याच्या राजकारणात बदललेल्या समीकरणांमुळे ही निवडणुक चुरशीची होणार आहे.

सध्या शिवसेनेतील (Shiv Sena) अंतर्गत बंडाळीमुळे राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. तसेच, राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहे. याचाच प्रभाव अंधेरीतील पोटनिवडणुकीत पाहायला मिळणार आहे.

शिवसेनेतील बंडानंतरची ही पहिली निवडणूक असल्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे. अशातच शिवसेनेत दोन गट झाल्यामुळे ही निवडणुक कशी होणार? ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गट (CM Eknath Shinde) कोणत्या निवडणूक चिन्हाचा वापर करणार? यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

आमदार रमेश लटके (Ramesh Latke News) यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना (Shivsena) विरुद्ध शिंदे गट (Shinde Group) असा सामना होणार होता. मात्र शिंदे गटाची ही जागा आता भाजपनं आपल्याकडे घेतली आहे. पोटनिवडणुकीत भाजप आपला उमेदवार उभा करणार आहे.

भाजपतर्फे मुरजी पटेल हे उमेदवार असणार आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर शिंदे गटानं इथे उमेदवार देत पोटनिवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र आता ही जागा भाजपनं आपल्याकडे घेतल्यानं अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत आता शिवसेना उद्धव ठाकरे गट विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे.



हेही वाचा

शिंदे-फडणवीस सरकार येताच महाराष्ट्रातील ४४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा