Advertisement

अंधेरीत मशाल विरुद्ध कमळ, भाजपच्या 'या' नेत्याचे नाव फायनल

अंधेरी पूर्वची जागा शिंदे गट लढवणार की भाजप हा तिढा आता सुटला आहे.

अंधेरीत मशाल विरुद्ध कमळ, भाजपच्या 'या' नेत्याचे नाव फायनल
SHARES

अंधेरी पूर्वची जागा शिंदे गट लढवणार की भाजप हा तिढा आता सुटला असून मुरजी पटेल भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही जागा आता शिंदे गटाला न जाता या ठिकाणी भाजप निवडणूक लढणार आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके विरुद्ध भाजपचे मुरजी पटेल हा सामना रंगणार आहे. 

गुरुवारी संध्याकाळी वर्षा या निवासस्थानी भाजप नेते आशिष शेलार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. त्यामध्ये ही जागा भाजपला सोडण्यावर दोन्ही बाजूने एकमत झालं. त्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुरजी पटेल यांना कमळ या चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या सूचना दिल्या.

अंधेरी पूर्व मतदारसंघात शिंदे गटापेक्षा भाजपची मोठी ताकत असल्याने या जागेसाठी भाजप आग्रही होता. त्यांचा उमेदवारही ठरला होता. मुरजी पटेल यांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली होती. पण शिंदे गटाकडूनही या जागेवर दावा करण्यात येत होता. 

शिवसेना उद्धव ठाकरेंच्या गटाकडून ऋतुजा लटके यांचं नाव अंतिम झालं असून त्या आपला उमेदवारी अर्ज उद्या भरणार आहेत. त्यांनी महापालिकेतील सेवेचा राजीनामा दिला होता. पण महापालिका प्रशासनाने त्यांचा हा राजीनामा स्वीकारला नव्हता. 

2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत अंधेरी पूर्व मतदारसंघात जवळपास 1 लाख 47 हजार 117 मतदान झाले होते. त्यापैकी रमेश लटके यांना 62 हजार 773 मतं मिळाली. तर मुरजी पटेल यांना 45 हजार 808 मतं होती. 2020 मध्ये मुरजी पटेल यांची भाजपच्या मुंबई उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या महामंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. 



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा