Advertisement

अनिल परब यांचा किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा मानहानीचा दावा

अनिल परब यांचे वकील सुषमा सिंग यांनी सोमय्यांना एक नोटीस पाठवली आहे.

अनिल परब यांचा किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा मानहानीचा दावा
SHARES

परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी मंगळवारी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांविरोधात १०० कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. परब यांचे वकील सुषमा सिंग यांनी सोमय्यांना एक नोटीस पाठवली आहे. त्यानुसार आता सोमय्या यांना ७२ तासात उत्तर देण्यास सांगतिलं आहे.

सोमय्या यांनी परब यांच्यावर कोकणात दापोली इथं बेकायदा हॉटेल बांधल्याचा आरोप केला होता. तसंच परिवहन विभागात बदल्यांचं रॅकेट परब यांनी चालवल्याचा जाहीर आरोपही सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर परब यांनी आता आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

सोमय्या यांनी परब यांच्यावर आरोप करतानाच काही पुरावेही सक्तवसुली संचालनालय आणि आयकर विभागाला दिले होते. दरम्यान परब यांनी सोमय्या यांचे आरोप फेटाळून लावत आज अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

किरीट सोमय्या यांनी यांनी ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ आणि कुटुंबियांवर १२७ कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यानंतर आज मंत्री मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली.

सोमय्यांचे आरोप आणि सत्य परिस्थिती यासंदर्भातली माहिती पवारांनी मुश्रीफांकडून घेतल्याचं कळतंय. दरम्यान, मुश्रीफ यांनीही सोमय्या यांच्याविरोधात १०० कोटी रुपयांचा दावा दाखल करणार असल्याचं कालच सांगितलं आहे.

किरीट सोमय्या मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी अर्थ या एनजीओवरदेखील गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. याच आरोपांबाबत सोमय्या यांना शिवडी न्यायालयानं समन्स बजावले आहेत. येत्या ५ ऑक्टोबर रोजी त्यांना न्यायालयात हजर राहावं लागणार आहे.

या आरोपांना आव्हान देत प्रवीण कलमे आणि अर्थ या स्वयंसेवी संस्थेनं न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. ही याचिका दाखल करून घेण्यात आली असून त्यावर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे सोमय्या यांना येणाऱ्या २२ सप्टेंबर आणि ५ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजेरी लावावी लागणार आहे. एवढेच नाही तर केलेले आरोप सिद्ध करण्यासाठी सोमय्या यांना खटाटोप करावा लागणार आहे.



हेही वाचा

जिल्हा परिषद निवडणुकांची तारीख जाहीर

डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्रे आहेत का? आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा