Advertisement

डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्रे आहेत का? आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुख्यमंत्र्यांच्या मंदिराच्या वक्तव्यावर आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्रे आहेत का? आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल एका कार्यक्रमात बोलतांना राज्याला मंदिरांची गरज आहे की आरोग्य मंदिरांची? असा प्रश्न केला होता. यावर आता भाजपा नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मंदिर आणि आरोग्य मंदिर या दोन्ही बाबतीत मुख्यमंत्री असंवेदनशीलता का दाखवत आहेत. राज्यात सुरु असलेली डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्र आहेत का? असा सवाल करत भाजपा नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

ते म्हणाले की “डिस्को, बार, पब बाबत आपण काही बोलणार आहात का, याचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. कट कमिशन आणि वाटाघाटी हा या ठाकरे सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे का? कारण कोविड सेंटर, आयसोलेशन सेंटर, आरोग्य सुविधा, सँनिटझर वाटप, सँनिटायझेशन या सगळ्या पुरवठा धारकांमध्ये जी काही कट कमिशनची प्रकरण समोर येतायत याच्यावर तुम्ही कधी भाष्य करणार आहात का?” असं देखील शेलार म्हणाले.

शेलार यांनी ठाकरे सरकारवर आरोप करत काही प्रश्न केले आहेत.

  • पब, रेस्टाँरंट, बार यांचे मालक यांच्याशी वाटाघाटी होतात आणि वाटाघाटी नंतर ते खुले होतात. कट कमिशन या धोरणानं तुम्ही निर्णय करता का?
  • एक्साईजची कमाई हवी म्हणून दारुची दुकानं उघडी केली, कामगारांच कारण सांगून मॉल उघडलेत मग मंदिरांच्या बाहेर नारळ, अगरबत्ती, धुप, फुल विकणारे यांची उपासमार दिसत नाही?
  • मंदिरात किती लोक आले पाहिजेत या बद्दल कोरोनाचे नियम करून बाहेर नारळ, अगरबत्ती, फुल विकणाऱ्याचे पोट भरु शकत नाही का?”

“मुख्यमंत्री आरोग्य केंद्राबाबत बोलतात तर मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. ठाणे जिल्ह्यामधे आदिवासी पाड्यातील ७४१ बालकांचा ६ महिन्यात मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. कुठे आहे आरोग्य व्यवस्था, कुठे आहेत आरोग्य केंद्रे? कुठे आहेत पायाभुत सुविधा? महानगरपालिकेच्या रुग्णालयात डोळा कुरतडून खाल्ला म्हणून मृत्यू, सायन ते नायर शवाच्या बाजूला जिवंत माणसाची ट्रिटमेंट, कोविड सेंटरमध्ये टॉयलेट मधे मृत्यू आणि आता बालकांचा मृत्यू, थोडी तरी संवेदनशीलता मुख्यमंत्री दाखवावी”, असंही शेलार म्हणाले.हेही वाचा

आरोग्य केंद्रे बंद करून मंदिरं उघडायची का? मुख्यमंत्र्यांचा भाजपाला टोला

भाजपा नेते किरीट सोमय्यांना झेड सुरक्षा

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा