SHARE

मुंबईच्या राजकीय आणि सामाजिक स्थिंत्यतराचा साक्षीदार असलेला 'हुतात्मा चौक' आता 'हुतात्मा स्मारक चौक' म्हणून ओळखला जाणार आहे. मुंबई महानगर पालिकेच्या सभागृहात चौकाच्या नव्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. 'हुतात्मा चौक' या नावाऐवजी 'हुतात्मा स्मारक चौक' असा बदल सूचवणारी सूचना मनसेचे मुंबई महापालिकेतील गटनेते दिलीप लांडे यांनी मांडली होती. लांडे यांची ही सूचना सोमवारी सभागृहात मंजूर करण्यात आली. त्यामुळे आता ‘हुतात्मा चौका’चे ‘हुतात्मा स्मारक चौक’ असे नाव झाले आहे. या भागाला आधी 'फ्लोरा फाऊंटन' असेही म्हटले जात होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या