Advertisement

'चिक्की घोटाळ्याची चौकशी पूर्ण, अजून कारवाई नाही' - मुख्यमंत्र्यांचं लेखी उत्तर


'चिक्की घोटाळ्याची चौकशी पूर्ण, अजून कारवाई नाही' - मुख्यमंत्र्यांचं लेखी उत्तर
SHARES

महिला आणि बालविकास विभागांतर्गत झालेल्या चिक्की गैरव्यवहारासंबंधी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीचा अहवाल सरकारला प्राप्त झाला आहे, मात्र त्यावर अजून कारवाई झाली नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.


धनंजय मुंडेंचा प्रश्न

नागपुरात सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी विधान परिषदेत चिक्की घोटाळ्याप्रकरणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीचा अहवाल मागवला का असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.


मुख्यमंत्र्यांचं उत्तर

धनंजय मुंडेंच्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी चिक्की घोटाळ्याची चौकशी पूर्ण झाली असली तरी या मुद्यांबाबत लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून अहवाल मागवण्यात आला असून अजून कारवाई झालेली नाही, अशी माहिती दिली.


प्रश्नाद्वारे मुंडेंची तक्रार

चिक्की घोटाळ्याप्रकरणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही चौकशी न करता ज्यांच्यावर आरोप आहेत त्याच विभागाकडून अभिप्राय मागवून विभागाच्या अभिप्रायाप्रमाणे चौकशी अधिकाऱ्यांचा निष्कर्ष दिला, अशी तक्रार मुंडे यांनी प्रश्नाद्वारे केली होती.


यांचं निलंबन करा - मुंडे

या प्रकरणी चौकशी अधिकारी आणि त्याप्रमाणे अहवाल सादर करायच्या सूचना देणाऱ्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करण्याबाबत तसेच सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याची मागणी मुंडे यांनी प्रश्नाद्वारे केली होती.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा