Advertisement

मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रभारी


मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रभारी
SHARES

अागामी लोकसभा अाणि राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षानं महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रभारी म्हणून लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांची नियुक्ती केली अाहे. गेली अनेक वर्षे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारीपद सांभाळणाऱ्या मोहन प्रकाश यांची पदावरून उचलबांगडी करण्यात अाली अाहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी ही घोषणा केली.


मोहन प्रकाशविरोधात अनेक तक्रारी

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारीपद जवळपास नऊ वर्षे सांभाळणाऱ्या मोहन प्रकाश यांच्या कार्यपद्धतीबद्दल अनेक राजकीय नेत्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यांना पदावरून बदलण्याची मागणीही केली जात होती. अखेर निवडणुकांपूर्वी हा महत्त्वपूर्ण बदल केल्यानं महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांमध्ये अानंदाचं वातावरण अाहे.


मल्लिकार्जुन अनुभवी नेते

७५ वर्षीय मल्लिकार्जुन खर्गे हे मुरलेले राजकारणी अाहेत. कर्नाटकमधल्या मल्लिकार्जुन यांना मराठीची उत्तम जाण अाहे. त्याचबरोबर सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण या मातब्बर नेत्यांबरोबर मिळून काम करू शकेल, असा चेहरा काँग्रेसला हवा होता. त्यामुळेच मल्लिकार्जुन खर्गेंना संधी मिळाल्याचं बोललं जात अाहे.



हेही वाचा -

'पंतप्रधानांमुळे संविधान धोक्यात', शरद पवारांचं टीकास्त्र


 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा