Advertisement

कर्नाटकातील फोडाफोडीची शेलार यांच्यावर जबाबदारी!

भाजपा सत्तेचं समीकरण जुळवण्यात अपयशी ठरली तर काँग्रेस-जेडीएसचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा होणार अाहे. म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत हे समीकरण जुळवून अाणण्याच्या टप्प्याला भाजपनं 'अाॅपरेशन कमळ' असं नाव दिलं अाहे. यासाठी स्पेशल ऑपरेशन टीममध्ये भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना बोलावलं अाहे.

कर्नाटकातील फोडाफोडीची शेलार यांच्यावर जबाबदारी!
SHARES

कर्नाटकात भाजपचं सरकार स्थापन होणार की काँग्रेस-जेडीएसचं? याचा फैसला दुपारी ४ वाजता होणार अाहे. सत्तेचं समीकरण जुळवण्यासाठी भाजपाची तारेवरची कसरत सुरू अाहे. भाजपा सत्तेचं समीकरण जुळवण्यात अपयशी ठरली तर काँग्रेस-जेडीएसचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा होणार अाहे. म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत हे समीकरण जुळवून अाणण्याच्या टप्प्याला भाजपनं 'अाॅपरेशन कमळ' असं नाव दिलं अाहे. यासाठी स्पेशल 'अाॅपरेशन कमळ'च्या टीममध्ये भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना देखील बोलावलं अाहे. त्यासाठी शनिवारी सकाळीच शेलार स्पेशल चार्टर्ड विमानानं बंगळुरूला रवाना झाले अाहेत.


याअाधीही कर्नाटकात तळ ठोकून होते

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते कर्नाटकात तळ ठोकून होते. यापैकी मुंबईचे भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडेही ४७ मतदारसंघाची जबाबदारी होती. त्यासाठी बंगळुरूमधील ग्रामीण आणि शहरी भागात आशिष शेलार निवडणूक काळात तळ ठोकून होते. त्यामुळे त्यांना इथल्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचं चांगलं भान आहे. त्यादृष्टीने शेलार आमदारांना आपल्या गोटात खेचून आणण्यात निर्णायक भूमिका बजावू शकतात.


फोडाफोडीचं राजकारण

कर्नाटक निवडणुकीत महत्त्वाची जबाबदारी निभावणाऱ्या अाशिष शेलार हे अामदार फोडाफोडीच्या राजकारणात महत्त्वाचे मानले जातात. सध्या भाजपकडे १०४ अामदार असून बहुमताचा ११२चा अाकडा गाठण्यासाठी भाजपला ८ अामदारांची अावश्यकता अाहे. त्यामुळे या स्पेशल अाॅपरेशन टीममध्ये असलेले अाशिष शेलार हे किंगमेकर ठरणार, अशी चर्चा सध्या भाजपच्या गोटात सुरू अाहे.


हेही वाचा -

कर्नाटकात शिवसेनेवर नामुष्की, सर्व उमेदवारांचं डिपाॅझिट जप्त

'इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा विजय असो' - राज ठाकरे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा