Advertisement

24 ऑगस्टला 'महाराष्ट्र बंद'ची हाक

शाळेच्या बाथरूममध्ये क्लिनरने दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेविरोधात हा बंद आहे.

24 ऑगस्टला 'महाराष्ट्र बंद'ची हाक
SHARES

बदलापूर इथल्या आदर्श विद्यामंदिर शाळेत (school) दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने शनिवारी (24ऑगस्ट) ‘महाराष्ट्र बंद’ (maharashtra bandh)ची हाक दिली आहे. या बंदमध्ये जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले आहे.

शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने दोन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार (molestation) केल्याची घटना मंगळवारी बदलापुरात (badlapur) घडली. संतप्त जमावाने बदलापूर रेल्वे स्थानकावर निदर्शने (protest) करत मध्य रेल्वेचा मार्ग दहा तासांहून अधिक काळ रोखून धरला.

महाविकास आघाडीने बुधवारी विधानसभेतील जागा वाटपावरील चर्चा रद्द केली. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांबाबत संताप व्यक्त करत शनिवारी राज्यव्यापी बंद पाळण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीला काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, माजी मंत्री अनिल देशमुख, जितेंद्र आवाड, शिवसेना (उबाठा) (shivsena ubt)नेते संजय राऊत आदी उपस्थित होते.



हेही वाचा

गणेशोत्सवात हायकोर्टाचा लाईट लेझर बीम, डीजे सिस्टिमचा वापर रोखण्यास नकार

महाराष्ट्रातील मतदार यादीत 'अशा' प्रकारे नोंदवा तुमचा नंबर

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा