भायखळ्यात बहुजन क्रांती मोर्चाचे आयोजन

 Mazagaon
भायखळ्यात बहुजन क्रांती मोर्चाचे आयोजन
भायखळ्यात बहुजन क्रांती मोर्चाचे आयोजन
भायखळ्यात बहुजन क्रांती मोर्चाचे आयोजन
See all

भायखळा - राणी बाग येथून शनिवारी सकाळी बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा भायखळा ते आझाद मैदान येथे काढण्यात आला. या मोर्च्यात अनेक बहुजन समाजातील बड्या नेत्यांनी, बहुजन जनता आणि मुस्लिम समुदायाच्या लोकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. वामन मेश्राम, जीवन भालेराव आणि अनेक बहुजन समाजाच्या नेत्यांनी या मोर्च्याचे आयोजन केले होते.

                  प्रमुख मागण्या

  • अॅट्रॉसिटी कायदा कडक करावा. या कायद्याअंतर्गत बोगस गुन्हा दाखल करण्यावरही कारवाई
  • महिलांवरील वाढत्या अत्याचारासाठी कठोर कायदे करावेत
  • इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम त्वरीत सुरू करावे
  • बहुजन जनतेच्या भावनांशी खेळणाऱ्या लोकांवर कारवाई करावी
  • ओबीसीसोबतच इतर जातींनाही जनगणना करून आरक्षण देण्यात यावे.
Loading Comments