Advertisement

वसई विरारच्या राजकारणात मोठा उलटफेर

वसई विरार महापालिकेचे माजी महापौर राजीव पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे.

वसई विरारच्या राजकारणात मोठा उलटफेर
SHARES

बहुजन विकास आघाडीचे कार्याध्यक्ष आणि वसई विरार (virar) महापालिकेचे (vvmc) माजी महापौर राजीव पाटील यांचा भाजप (bjp) प्रवेश झाला आहे. रविवारी त्यांनी अधिकृतपणे भाजप मध्ये प्रवेश केला आहे.

वसईचे (vasai) आमदार हितेंद्र ठाकूर हे बहुजन विकास आघाडी (bva) पक्षाचे सर्वेसर्वा असले तरी त्यांचे आत्येबंधू राजीव पाटील हे पक्षातील आघाडीचे नेते होते. तसेच ते पक्षाचे कार्याध्यक्षही होते. 

वसई विरार महापालिकेचे ते प्रथम महापौर होते. मात्र राजीव पाटील यांनी आता भाजप मध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय शहरात नागरिकांना शुभेच्छा देणारे वैयक्तिक फलक लावले होते. मी भाजप मध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे राजीव पाटील यांनी लोकसत्ताला याआधी सांगितले होते. 

रविवारी भाजपाच्या प्रदेश कार्यालयात राजीव पाटील यांचा भाजपात प्रवेश झाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला.

बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर (hitendra thakur) यांनी राजीव पाटील यांच्या पक्ष सोडण्याच्या भूमिकेवर मौन बाळगले. कुटुंब आणि राजकारण या वेगळ्या गोष्टी आहेत असे त्यांनी यापूर्वी सांगितले होते. 

बहुजन विकास आघाडीच्या कार्यक्रमाच्या फलकांवरून राजीव पाटील यांचे नाव आणि छायाचित्रे वगळण्यात आले आहे. राजीव पाटील (rajiv patil) यांच्या पक्ष सोडण्याच्या भूमिकेमुळे वसई विरारच्या राजकारणात मोठा उलटफेर झाला आहे.



हेही वाचा

लक्ष द्या! कल्याण-डोंबिवलीत 15 ऑक्टोबरला पाणीपुरवठा बंद

सलमान खानच्या सुरक्षेत वाढ, बिग बॉसचे शूटिंग थांबवलं

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा