रक्तदान महादान

 Mumbai
रक्तदान महादान
रक्तदान महादान
रक्तदान महादान
रक्तदान महादान
रक्तदान महादान
See all

जोगेश्वरी - बेहरामबागमधल्या शाळेत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलच्या वतीनं हे शिबीर आयोजित केलं होतं. शिबिराचं उदघाटन स्थानिक आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. शिबिरामध्ये रामनगर, बेहरामबाग परिसरातील युवा मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. दुपारी दोनपर्यंत 105 रक्तदात्यांनी रक्तदान केलं. मानस सेरॉलॉजिकल इन्स्टिट्युट ब्लड बँकतर्फे प्रमाणपत्र देऊन रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला.

वर्सोवा विधानसभेचे भाजपचे महिला उपाध्यक्ष उर्मिला गुप्ता, रवी गुप्ता, कमलेश शर्मा, रंजना पाटील, किरण गुलानी आदी कार्यकर्त्यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

Loading Comments