Advertisement

Bakra Eid: बकरे खरेदी-विक्री आॅनलाईन करणार- अस्लम शेख

बकरी ईद संदर्भात लवकरच मार्गदर्शक तत्त्वे आखणार असल्याची माहिती मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी बुधवारी मंत्रालयातील आपल्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

Bakra Eid: बकरे खरेदी-विक्री आॅनलाईन करणार- अस्लम शेख
SHARES

बकरी ईद संदर्भात लवकरच मार्गदर्शक तत्त्वे आखणार असल्याची माहिती मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी बुधवारी मंत्रालयातील आपल्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. कंटेंन्मेंट झोनमध्ये कुठलेही सण साजरे करण्यास परवानगी नसेल, असंही यावेळी अस्लम शेख यांनी यावेळी स्पष्ट केलं. (bakra eid guideline will declare soon for maharashtra says mumbai city guardian minister aslam sheikh)

यासंदर्भात अधिक माहिती देताना अस्लम शेख म्हणाले की, बकरे खरेदी-विक्रीसाठी सरकारच्यावतीने ऑनलाईन प्रणाली बनवण्यात येईल. कुर्बानीसाठी गर्दी करण्यास सक्त मनाई असेल. देवनार मंडीसारख्या मोठ्या मंडींना परवानगी देण्यात येणार नाही. मार्केट केवळ खुल्या मैदानातच लावलं जाईल, असंही अस्लम शेख यांनी सांगितलं.

तत्पूर्वी, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोना संकटाचा मुकाबला करण्याचं मोठं आव्हान आहे. सण-उत्सव साजरा करताना गर्दी होऊ न देणे याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. वाहतुकीमुळे साथीचा रोग पसरण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ही गोष्ट टाळायला हवी. यावर्षी संकटाचा सामना करून पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात सर्व सण-उत्सव साजरे करू. त्यामुळे बकरी ईद निमित्त बकरी खरेदी करण्यासाठी मंडीचा आग्रह नको.

हेही वाचा - Bakra Eid: बकरी मंडीचा आग्रह नको- उद्धव ठाकरे

महाराष्ट्रातील सर्व जनतेने जात-पात, धर्म-पंथ न मानता कोरोनाविरुद्धच्या लढ्यात जे सहकार्य केलं. आतापर्यंत झालेल्या सर्व सणांमध्ये सर्वांकडून सहकार्य मिळालं. बकरी ईदमध्ये देखील असंच सहकार्य अपेक्षित आहे. धार्मिक भावनांचा आदर करून बकरी ईदसुद्धा साधेपणाने साजरी करावी. सण साजरे करताना आरोग्याचा विचार देखील करणं आवश्यक आहे. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील, तो जनतेला समजावून देण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी, बकरी ईद निमित्त सर्वांनी सहकार्य करावं. साधेपणाने हा सण साजरा करावा. शक्यतो कुर्बानीचे विधी ऑनलाईन करावेत. आंतरराज्य वाहतूक अवघड आहे. त्याचाही विचार करावा लागेल. कंटेंन्मेंट झोन वगैरे अडचणी लक्षात घेता तसंच पोलिसांवरील ताण विचारात घेऊन ईद साधेपणाने करावी, असं आवाहन केलं. 

कोरोना संकटाच्या काळात काही अटी शर्थींच्या आधारे राज्य सरकारने ज्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर बकरी ईद सण साजरा करण्यास परवानगी मिळावी, अशी तमाम मुस्लिम समाजाची मागणी आहे, त्यामुळे यावर तातडीने निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस नेते नसीम खान यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. 

हेही वाचा - Bakra Eid: गणेशोत्सवाला दिली तशी बकरी ईदलाही परवानगी द्या, ‘या’ नेत्याची मागणी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा