Advertisement

Bakra Eid: गणेशोत्सवाला दिली तशी बकरी ईदलाही परवानगी द्या, ‘या’ नेत्याची मागणी

कोरोना संकटाच्या काळात काही अटी शर्थींच्या आधारे राज्य सरकारने ज्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर बकरी ईद सण साजरा करण्यास परवानगी मिळावी, अशी तमाम मुस्लिम समाजाची मागणी आहे

Bakra Eid: गणेशोत्सवाला दिली तशी बकरी ईदलाही परवानगी द्या, ‘या’ नेत्याची मागणी
SHARES

कोरोना संकटाच्या काळात काही अटी शर्थींच्या आधारे राज्य सरकारने ज्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर बकरी ईद सण साजरा करण्यास परवानगी मिळावी, अशी तमाम मुस्लिम समाजाची मागणी आहे, त्यामुळे यावर तातडीने निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस नेते नसीम खान यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. (congress leader naseem khan demands permission to celebrate bakra eid in maharashtra)

काँग्रेस नेते नसीम खान यांनी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात ते म्हणतात की, येत्या १ आॅगस्ट २०२० रोजी ईद उल अदाह (बकरा ईद) चा सण येत आहे. हा सण मुस्लीम समाजाचा खूप महत्त्वाचा सण असून त्या दिवशी कुर्बानी करणं अनिवार्य (वाजिब) आहे. सण जवळ आल्यामुळे आतापर्यंत शासनाकडून या विषयी हा सण साजरा करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे मुंबईसह संपूर्ण राज्यातील मुस्लीम समाज व मुस्लीम संघटनांमध्ये खूप अस्वस्थता निर्माण झाली आहे.

कोविड १९ काळात काही शर्थींच्या आधारावर जसा गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्याच धर्तीवर मुस्लीम समाजाचा महत्त्वाचा ईद उल अदाह (बकरा ईद) सणादिवशी कुर्बानी करण्याची सूट देण्यात यावी, अशी मागणी राज्याचे अनेक प्रमुख मुस्लीम संघटन व समाजाची आहे. 

म्हणून येणाऱ्या बकरा ईद सणादिवशी कुर्बानी करण्याची व्यवस्था व निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा, अशी मागणी नसीम खान यांनी केली आहे.   

हेही वाचा - Ganesh Festival 2020: घरगुती गणेशमूर्तीं फक्त २ फुटांचीच! राज्य सरकारची सूचना

दरम्यान, राज्य सरकारने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी घरगुती भाविक तसंच गणेशोत्सव मंडळांसाठी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सर्व संबंधित सार्वजनिक गणेश मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासनाची त्यांचे स्थानिक धोरणानुसार यथोचित पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे. श्री गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळाकरिता ४ फूट व घरगुती गणपतीसाठी २ फुटाच्या मर्यादित असावी.

यावर्षी शक्यतो पारंपरिक गणेशमूर्ती ऐवजी घरातील धातू संगमरवर आदी मूर्तीचं पूजन करावं. मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असल्यास त्याचं विसर्जन शक्यतो घरच्याघरी करावं. घरी विसर्जन करणं शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावं. गणेश मूर्तीचे विसर्जन पुढे ढकलणं शक्य असल्यास त्या मूर्तीचं विसर्जन माघी गणेशोत्सव विसर्जनाच्या वेळी किंवा २०२१ च्या भाद्रपद महिन्यात म्हणजेच पुढील वर्षाच्या विसर्जनाच्यावेळी करता येणं शक्‍य आहे. जेणेकरून श्री गणेशाचं आगमन/ विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळता येऊ शकते. यामुळे स्वतःचं व कुटुंबियांचं कोरोना साथीच्या रोगांपासून रक्षण होईल. अशा काही अटी घातल्या आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा