Advertisement

नोटाबंदीचा त्रास गरीबांनाच- राहुल गांधी


नोटाबंदीचा त्रास गरीबांनाच- राहुल गांधी
SHARES

मुंबई - नोटा बदलण्यासाठी गरीबांनाच रांगेत उभं राहावं लागलं, काळा पैसा असणारे मात्र यातून सटकले अशी बोचरी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर केलीय. नोटा बदलणार ही पूर्व कल्पना मोदींनी भाजपच्या नेत्यांना आधीच दिल्याची टीकाही राहुल गांधींनी यावेळी केली. पश्चिम बंगालमधील नेत्यांनी अगोदरच पैसे कसे डिपॉझिट केले असा सवालही राहुल गांधींनी यावेळी उपस्थित केला. काँग्रेस काळ्यापैशाविरोधात आहे. मोदींनी निर्णय घेतला त्याला हरकत नाही. मात्र निर्णय घेण्यापूर्वी काही तरी पूर्व नियोजन करणं आवश्यक होतं, असंही राहुल गांधी यावेळी म्हणालेत. जर मोदींना देशातला काळा पैसा बाहेर काढायचा होता तर मग 2000 ची नोट का आणली यामागचे लॉजिक काय हे मात्र समजलं नाही असं म्हणत राहुल गांधींनी मोदींची खिल्ली उडवली. सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे गरीबांना नाहक त्रास झालाय. बुधवारी भिवंडी न्यायालयात हजर राहण्यासाठी राहुल मंगळवारी मुंबईत दाखल झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,नारायण राणे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, गुरुदास कामत, नसिम खान यांच्यासह मोठ्यासंख्येनं काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा