ईद-ए-मिलाद निमित्त पक्षांची पोस्टरबाजी

Fort
ईद-ए-मिलाद निमित्त पक्षांची पोस्टरबाजी
ईद-ए-मिलाद निमित्त पक्षांची पोस्टरबाजी
ईद-ए-मिलाद निमित्त पक्षांची पोस्टरबाजी
See all
मुंबई  -  

क्रॉफर्ड मार्केट - पालिका निवडणूक जवळ आली असताना नागरिकांना आकर्षित करण्यासाठी अनेक पक्षांनी ईद-ए-मिलादचं निमित्त साधून ठिकठिकाणी आपल्या पक्षाचे बॅनर लावले. या वेळी कुणाचे जास्त बॅनर यावरून खडाजंगी सुरू असल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये काँग्रेस शिवसेना, समाजवादी पार्टी, एमआयएम अशा अनेक पक्षांनी बॅनर लावले होते. त्यात अल्पावधीत जास्त प्रभाव टाकणाऱ्या एमआयएम या पक्षानं मोहम्मद अली रोड परिसरात 30हून अधिक बॅनर लावल्याचं आढळून आलं. समाजोपयोगी कामासाठी बॅनर लावताना मात्र अनेक जण विरोध दर्शवतात. पण अशा राजकीय स्टंट विरोधात कुणीही येत नसल्याचं सामान्यांचं म्हणणं होतं.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.