झोपड्यांवरील कारवाई सुरूच राहणार

 Mumbai
झोपड्यांवरील कारवाई सुरूच राहणार

मुंबई - 14 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या झोपड्यांवर कारवाई करायला पालिकेनं सुरुवात केलीय. मात्र मतांवर डोळा ठेवत झोपड्यांविरोधातील कारवाई थांबवण्यासाठी मनसे वगळता सर्व पक्ष एकवटले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षाच्या हस्तक्षेपामुळे ही कारवाई होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेनेने कारवाई थांबवण्यासंबंधीची हरकतीचा मुद्दा मांडला आणि त्याला मनसे वगळता सर्वच पक्षांनी समर्थन दिलं.

बेहरामपाडा आणि जुहू गल्लीतील दुर्घटना पाहता अवैध बांधकामांना थारा दिला जाणार नाही, असं पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी स्पष्ट केलंय. तसंच उंच, अवैध झोपड्या बांधल्या गेल्या तर त्यासाठी सहाय्यक आयुक्ताला जबाबदार धरलं जाईल. त्या सहाय्यक आयुक्ताविरोधात कारवाई केली जाईल, असंही त्यांनी ठणकावलं.

Loading Comments