SHARE

कांदिवली – मुंबई काँग्रेसचे प्रदेक्षाध्यक्ष संजय निरुपम यांच्या बाटी चोखा भोजन कार्यक्रमात गुरुवारी राडा झाला. कांदिवलीतल्या इरानी वाडी परिसरातल्या स्थानिकांना काँग्रेसकडून बाटी चोखा दावत देण्यात आली होती. सहा वाजल्यापासून रहिवासी यासाठी प्रतिक्षा करत होते. पण नऊ वाजून गेले तरी कोणालाच दावत मिळाली नाही. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी राडा घातला. "या दावतमध्ये नेते मंडळी आल्यानं बाटी चोखा पुरला नाही. नेत्यांपूर्तीच ही दावत होती, असा आरोप इथल्या रहिवाशांनी केला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या