Advertisement

धनंजय मुंडे आणि सुप्रिया सुळेंनी स्वीकारलं 'शिवकन्ये'चे पालकतत्व

मुलीच्या शिक्षणासह लग्नापर्यंतची सर्व जबाबदारी दोघांनी स्वीकारली आहे.

धनंजय मुंडे आणि सुप्रिया सुळेंनी स्वीकारलं 'शिवकन्ये'चे पालकतत्व
SHARES
समाजात आज ही मुलींना दुय्यम वागणूक दिली जाते. एकीकडे मुलीला लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा म्हणून तिची मुर्तीरूपात पूजा करतात तर, दुसरीकडे मुलगी जन्मल्यावर ती नकोशी म्हणून स्त्रीभ्रुण हत्या किंवा तिला निर्जनस्थळी सोडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. नुकताच असा प्रकार बीडच्या परळी तालुक्यात घडला. या घटनेची माहिती मिळताच पालकमंञी धनंजय मुंडे आणि सुप्रिया सुळे यांनी त्या मुलीची संपूर्ण जबाबदारी स्विकारली. या मुलीचे नाव धनंजय मुंडेंनी 'शिवकन्या'असॆ ठेवले आहे. या घटनेनंतर सोशल मिडियावर धनंजय मुंडॆ आणि सुप्रिया सुळेंच्या कौतुकांचा वर्षाव होत आहे.


 
महाशिवरात्री महोत्सवादरम्यान कोणीतरी स्त्री जातीच्या अर्भकाला रेल्वे रूळावर सोडून गेल्याची धक्कादायक घटना घडली. परिसरातील नागरिकांना बाळाच्या रडण्याचा आवाज आला. पालकमंत्री धनंजय मुंडे यांना ही गोष्ट समजताच त्यांनी तात्काळ या मुलीला वैद्यकीय उपचारांसाठी दवाखान्यात दाखले केले. इतकच नव्हे तर धनंजय मुंडे आणि खासदार  सुप्रिया सुळे यांनी  या मुलीचे पालकत्व स्विकारले. त्या मुलीच्या शिक्षणासह लग्नापर्यंतची सर्व जबाबदारी यांनी स्विकारली आहे. महाशिवरात्री महोत्सवादरम्यान हा प्रकार घडल्याने नवजात मुलीचे ‘शिवकन्या’असे नामकरण करण्यात आले आहे. धनंजय मुंडे यांनी केलेल्या कामगिरीची सर्वत्र कौतूक होत आहे. तसेच शिवकन्या सुखरूप असून तिच्यावर योग्य उपचार केले जात असल्याची माहिती मुंडे यांनी ट्विटरहून दिली आहे.


दरम्यान, नेमका हा प्रकार कोणी केला, हे अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा पोलिस तपास घेत आहेत. या प्रकाराची माहिती मिळताच परळी शहरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच आजही समाजात स्त्री- पुरूष यांच्यात भेदभाव केला जात आहे. यातून स्त्रीभ्रुण हत्येसारखा धक्कादायक प्रकार समोर येत आहेत.
संबंधित विषय
Advertisement