Advertisement

मुंबई-ठाणे-नवी मुंबईत बंदला सुरुवात, मनसे-काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड


मुंबई-ठाणे-नवी मुंबईत बंदला सुरुवात, मनसे-काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड
SHARES

इंधन दरवाढीच्या धर्तीवर केंद्र सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसकडून सोमवारी १० सप्टेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला मनसे, राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य पक्षांनी पाठिंबा दिला असून या बंदला सकाळपासून मुंबई-ठाणे आणि नवी मुंबईत सुरुवात झाली आहे. 


सकाळी ७ वाजल्यापासून ९ वाजेपर्यंत मुंबई-ठाणे-नवी मुंबईतील जनजीवन सुरळीत सुरू होते. बेस्ट, रेल्वे, मेट्रो वाहतूक सेवाही सुरळीत होती. पण ९ वाजल्यानंतर मात्र मुंबई-ठाण्यात ठिकठिकाणी काँग्रेस आणि मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देत अनेक ठिकाणी दुकानं बंद करण्यात आली. अंधेरीसह अन्य रेल्वे स्थानकावर कार्यकर्त्यांनी लोकल अडवून धरल्या तर मेट्रो सेवेलाही काही काळ फटका बसला.


काही ठिकाणी दगडफेक

सकाळी ९ नंतर रस्त्यावर उतरलेले काँग्रेस-मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले नि काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. प्रतिक्षानगर आणि वाशी नाका इथं बसवर दगडफेक करण्यात आली. त्यात बसच्या काचा फुटल्या. तर चेंबूर इथंही गाड्यांची तोडफोड करण्यात आली. तर गोरेगावमध्ये मसने कार्यकर्त्यांनी बेस्टच्या बसच्या टायरची हवाच काढून टाकली. अंधेरी रेल्वे स्थानकावर ट्रॅकवर उतरत लोकलही रोखण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. दादर शिवसेना भवन इथं तर मनसे कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढत पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारविरोधातला रोष व्यक्त केला.


कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

काँग्रेस आणि मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्यानं १० वाजल्यानंतर पोलिसांनी काँग्रेस आणि मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली. अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, संजय निरूपण, संदिप देशपाडे, नितीन सरदेसाई यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान कार्यकर्ते मात्र अजूनही रस्त्यावर असून बंद यशस्वी करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांचा दिसत आहे.


दिंडोशीमध्ये भाजप नगरसेवकाचं कार्यालय मनसे कार्यकर्त्यांनी फोडलं

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा