दिंडोशीत नृत्य स्पर्धेचं आयोजन

 Dindoshi
दिंडोशीत नृत्य स्पर्धेचं आयोजन

दिंडोशी - दिवाळीनिमित्त भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीनं सोमवारी दिंडोशी विधानसभा क्षेत्रातल्या तरूणांसाठी सोलो नृत्य स्पर्धा आयोजित कोल्या होत्या. यामध्यो मोठ्या संख्येनं तरूणांनी सहभाग घेतला. या वेळी दोन ग्रुप करण्यात आले होते. लहान मुलांच्या ग्रुपमध्ये प्राप्ती देसाई तर मोठ्या मुलांच्या ग्रुपमध्ये तेजस्वी आचार्यनं बाजी मारली. या दोघींचा सन्मान आमदार सुनील प्रभू यांच्या हस्ते करण्यात आला.

या वेळी साईराज मित्रमंडळाचे अध्यक्ष आणि भारतीय विद्यार्थी सेनेचे उपविभाग संघटक रुपेश परब, आरोग्य समितीचे अध्यक्ष प्रशांत कदम, नगरसेवक सुनील गुजर, उपविभाग प्रमुख विष्णु सावंत, सुहास वाडकर, महिला उपविभाग संघटक पूजा चौहान, भारतीय विद्यार्थी सेना विभाग तीनचे निमंत्रक विजय गावडे, विधानसभा संघटक प्रशांत मानकर, निमंत्रक संतोष कदम, रणवीर चौहान उपस्थित होते.

Loading Comments