Advertisement

संभाजी भिडेंच्या हस्तकाकडून मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका-प्रकाश आंबेडकर यांचा गौप्यस्फोट


संभाजी भिडेंच्या हस्तकाकडून मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका-प्रकाश आंबेडकर यांचा गौप्यस्फोट
SHARES

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणाने आता एक वेगळं वळण घेतलं आहे. भीमा-कोरेगाव हिंसाचार घडवण्याचा आरोप करत ज्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे त्या संभाजी भिडे यांच्या हस्तकाकडून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याय जीवाला धोका असल्याचा गौप्यस्फोट भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषेदत केला. भिडेंच्या या हस्तकाने फेसबुकवर मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याचं आवाहन केल्याचं सांगत त्यासंबंधीची फेसबुकवरील पोस्टही आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांसमोर दाखवली.

आंबेडकर यांनी ज्या हस्तकाविरोधात हा आरोप केला आहे. त्या हस्तकाचं नाव आहे रावसाहेब पाटील. रावसाहेब पाटील याने १ जानेवारीला फेसबुकवर एक पोस्ट टाकली असून या पोस्टनुसार मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री आणि सुधींद्र कुलकर्णी यांना टार्गेट करण्यात आलं आहे. मुख्यंमत्र्यांच्या जीवाला धोका असल्याबद्दल, अशा भडकाऊ पोस्टबद्दल पुण्याच्या पोलिस आयुक्तांपासून गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुखांना असून ही बाब जाणीवपूर्वक मुख्यमंत्र्यांपासून लपवली जात असल्याचा धक्कादायक आरोपही आंबेडकर यांनी यावेळी केला.

मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि सुधींद्र कुलकर्णी यांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या, भडकाऊ पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात त्वरीत कारवाई करण्याची मागणी आंबेडकर यांनी केली आहे.



हेही वाचा-

भीमा-कोरेगाव हिंसाचार: दडपशाहीचं कोम्बिंग आॅपरेशन ताबडतोब थांबवा- प्रकाश आंबेडकर


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा