Advertisement

आदित्य ठाकरेंना मोठा धक्का! वरळी मतदारसंघातील 'हा' नेता शिंदे गटात


आदित्य ठाकरेंना मोठा धक्का! वरळी मतदारसंघातील 'हा' नेता शिंदे गटात
SHARES

शिंदे गटाने थेट आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात (Aditya Thackeray Worli Constituency) घुसखोरी केली आहे. वरळीमधील माजी नगरसेवक संतोष खरात यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. संतोष खरात हे वरळीतील वॅार्ड क्रमांक १९५ मधील होते नगरसेवक होते.

समाधान सरवणकर, शीतल म्हात्रेंच्या पाठोपाठ आता संतोष खरातही बाळासाहेबांच्या शिवसेनेत सहभागी झाल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. आदित्य ठाकरेंच्याच मतदारसंघातला माजी नगरसेवक शिंदे गटात गेल्याने चर्चा रंगली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस निशाण्यावर आहे. शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाची तयारी करत असल्याची माहिती आहे. यामध्ये काही मोठ्या नेत्यांचा समावेश असून एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होऊ शकतो. यानिमित्ताने शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातील नेते जितेंद्र आव्हाड यांना राजकीय शह देण्याची तयारी करत असल्याचं बोललं जात आहे.

"पैसेवाल्या शिवसेनेच्या नेत्यांकडून कळवा-मुंब्र्यामधील नगरसेवकांना खुलेआम तुला 1 कोटी देतो, तुझ्या पत्नीला 1 कोटी देतो अशाप्रकारे आमिष दाखवणे सुरु झाले आहे. तसेच नगरसेवक असेल तर तुला तिकीट देतो आणि आता तुला 10 कोटी रुपयांची कामे...ही आहे राष्ट्रवादी फोडण्याची पद्धत," असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत केला आहे.

"माझा बंधुतुल्य सहकारी जितू पाटील जो मागच्या निवडणूकीत निवडून आला होता, त्याला वेगवेगळी आमिष दाखवून पैसेवाल्यांच्या सेनेत घेण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यासाठी बटलू गद्दार हा प्रामाणिक प्रयत्न करतोय. आता मोरयासारखे जाऊन तिथे 4-4 तास त्याच्या घरी बसाल, तर तो काय घरातून हालकून देईल पण आपण किती वेळ कोणाच्या घरी बसावं ह्याची तर लाज बाळगा. लोचटासारखे किती वेळ बसाल," असा संतापही आव्हाडांनी व्यक्त केला.

"सगळेच धंदा करायला बसलेत आणि स्वतःचा विक्रीचा रेट लावतायेत असे समजू नका. काही स्वाभिमानी माणसं सुद्धा या जगात जिवंत आहेत. पैशाने सगळ्यांनाच विकत घेता येतं हा डोक्यातला भ्रम काढून टाका," अशा शब्दांत आव्हाडांनी सुनावलं.



हेही वाचा

पराभवाचे हादरे बसू लागल्याने भाजपने हिंदू-मुस्लीम हुकमी खेळ सुरू केलाय, 'सामना'तून टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा