Advertisement

भाजपाचे प्रसाद लाड विजयी, काँग्रेस-राष्ट्रवादीची मतंं फुटली


भाजपाचे प्रसाद लाड विजयी, काँग्रेस-राष्ट्रवादीची मतंं फुटली
SHARES

विधानपरिषद पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार प्रसाद लाड विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप माने यांचा पराभव केला. प्रसाद लाड यांना २०९ मतं, दिलीप माने यांना ७३ मतं मिळाली, तर २ मतं बाद झाली आहेत.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्या जागेसाठी ही निवडणूक पार पडली.


'ते' अदृश्य हात भाजपाच्या मदतीला 

या निवडणुकीत काही अदृश्य हात देखील भाजपाच्या बाजूने मतदान करतील, असं भाजपाकडून आधीच सांगण्यात आलं होतं. त्यानुसार काही अपक्ष आणि काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची एकूण १५ मतं लाड यांच्या पारड्यात पडली.


१५ क्राॅस व्होटींग

सत्ताधाऱ्याकडे स्वतः ची १२२, शिवसेना ६२, ३ बहुजन विकास आघाडी आणि ७ अपक्ष अशी १९४ मते होती. मात्र प्रसाद लाड यांना २०९ मते पडली. म्हणजेच एकूण १५ जास्त मतं लाड यांना मिळाली. तर विरोधकांकडे काँग्रेस ४२, राष्ट्रवादी ४०, शेकाप ३, समाजवादी पक्ष १, माकप १ आणि भारिप बहुजन महासंघ १ अशी ८८ मतं होती. मात्र माने यांना ७३ मतं पडल्याने जवळपास १५ क्रॉस व्होटींग झाल्याचं समोर आलं आहे.


कोण अदृश्य हात माझ्या मदतीला आले तो शोध आता विरोधकांनी घ्यावा. नारायण राणे यांचे धन्यवाद तसेच विरोधकांनी ज्यांनी मदत केली त्यांना देखील धन्यवाद. मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेच्या वतीने पोलिंग एजंट म्हणून आले होते. या निवडणुकीमुळे आमची युती सक्षमपणे लोकांसमोर आली.

- प्रसाद लाड, विजयी उमेदवार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा