Advertisement

कांदिवली पोटनिवडणुकीत भाजपाच्या प्रतिभा गिरकर विजयी


कांदिवली पोटनिवडणुकीत भाजपाच्या प्रतिभा गिरकर विजयी
SHARES

कांदिवली येथील प्रभाग २१ मधील पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवार प्रतिभा गिरकर या विजयी झाल्या आहेत. भाजपाच्या उमेदवार प्रतिभा गिरकर यांनी ७,१२२ मताधिक्याने विजयी होत काँग्रेसच्या उमेदवार नीलम मधाळे यांचा दारुण पराभव केला. गिरकर यांच्या विजयामुळे भाजपाची महापालिकेतील नगरसेवक संख्या ८३ वर पोहोचली आहे.


सर्वात कमी मतदान

मुंबई महापालिकेच्या प्रभाग २१ मधील पोटनिवडणुकीसाठी बुधवारी मतदान पार पडलं. या निवडणुकीत एकूण २८.७५ टक्के एवढं मतदान झालं. महापालिकेच्या आजवरच्या सर्व पोटनिवडणुकीच्या तुलनेत या पोटनिवडणुकीत हे सर्वांत कमी झालेले मतदान आहे. त्यामुळे भाजपाच्या उमेदवार प्रतिभा गिरकर यांना मोठा धोका मानला जात होता.



गिरकर ९१०६ मतांनी विजयी

गुरुवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीत प्रतिभा गिरकर यांनी २ हजार मतांची आघाडी घेतली होती, त्यानंतर दुसऱ्या फेरीतही २ हजार मतांची आघाडी आपला विजय निश्चित केला. पहिल्या दोन्ही फेरीत काँग्रेसच्या नीलम मधाळे यांना अनुक्रमे १७८ आणि १६८ मतं मिळाली. त्यामुळे शेवटच्या फेरीत गिरकर यांना ९१०६ मतं मिळाली तर, नीलम मधाळे यांना १९८४ मतं मिळाली. त्यामुळे गिरकर ७१२२ मताधिक्याने विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. गिरकर यांनी पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत ४ हजार मतांची आघाडी घेतल्यानंतर भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंनदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली होती.


शैलजा गिरकर यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक

मुंबई महापालिकेच्या प्रभाग २१मध्ये भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि माजी उपमहापौर शैलजा गिरकर या फेब्रुवारी २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आल्या होत्या. पणत्यानंतर त्याचे निधन झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर पोटनिवडणुक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी शैलजा गिरकर यांची सुन प्रतिभा गिरकर या भाजपाच्या तिकिटावर, तर काँग्रेसच्यावतीने निलम मधाळे या दोनच उमेदवार निवडणूक रिंगणात होत्या.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा