भाजपामध्ये उमेदवारीवरून वाद

 Vikhroli
भाजपामध्ये उमेदवारीवरून वाद
Vikhroli, Mumbai  -  

विक्रोळी - पार्क साईट येथील वर्षानगर प्रभाग क्रमांक 123 हा महिलांसाठी आरक्षित झाला आहे. प्रभाग 123 मधून भाजपाच्या संगिता पडवळ, बबिता चौहान, हर्षदा कोदे आणि जयश्री चौघुले चार महिला इच्छुक होत्या. मात्र हर्षदा कोदे आणि बबिता चौहान या दोन्ही भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलून दोन महिन्यांपूर्वी पक्षात प्रवेश करणाऱ्या संगिता पडवळ यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपामध्ये अंतर्गत वाद सुरू झाला आहे. नाराज झालेल्या हर्षदा कोदे प्रभाग क्रमांक 123 मधून अपक्ष लढणार आहेत. त्यामुळे भाजपाच्या उमेदवार संगिता पडवळ यांना हर्षदा कोदे यांचं आव्हान असणार आहे.

Loading Comments